संगमनेर : झुंजार न्यूज
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विषयी प्रश्न विचारल्याने वाईट वक्तव्य करत थुंकणाऱ्या शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या विरोधात संगमनेरच्या बस स्थानक चौकात शिवसेनेने (शिंदे गट) निषेध करत आंदोलन केले.
राऊत यांनी केलेल्या कृतीचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेविषयी (शिंदे गट) वाईट वक्तव्य केल्यास शिवसेना गप्प बसणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे, उपतालुका प्रमुख विठ्ठल ढगे, माजी शहर प्रमुख दिनेश फटांगरे, अमोल मतकर, बाळासाहेब राऊत, वाहतूक सेना तालुका प्रमुख अरुण उदमले, वैद्यकीय सहाय्यता कक्ष तालुका प्रमुख महेश उदमले, मागासवर्गीय सेल तालुका प्रमुख राहुल पवार, सरपंच सुदाम खैरे, अभिषेक गायकवाड, उपशहर प्रमुख अमोल नाते, बाळासाहेब व्यवहारे, योगेश जाधव, शाहरुख शेख, अजीज कुरेशी, अन्सार सय्यद, लाला शेख, लल्लू कुरेशी अजून इतर शिवसैनिक उपस्तित होते.
