संगमनेर | झुंजार न्यूज

नांदेड मधील बोनडार गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून निर्दोष भीमसैनिक अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करणाऱ्या जातीवादी मानसिकतेच्या निर्दयी आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी केली आहे.

भालेराव यांच्या हत्येचा आणि बोनडार गावातील दलित वस्तीवर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे आपण तीव्र निषेध करीत असल्याचे शेळके यांनी सांगितले आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून एका बौद्ध तरुणाची निर्घृण हत्या केली जाते. ही निंदनीय आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो असे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. 
दिवंगत अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांपैकी काही जणांना अटक झाली असून उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. दिवंगत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत तात्काळ द्यावी. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देऊन कुटुंबाचे पूनर्वसन करावे.अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी जेणे करून पुन्हा असा गुन्हा कोणी करू नये असा कायद्याचा धाक निर्माण होईल अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भातील निवेदन त्यांनी संगमनेर,आश्वी,घारगांव पोलीस ठाण्यात दिले यावेळी रिपाइंचे संगमनेर तालुका युवाध्यक्ष योगेश मुन्तोडे , शहराध्यक्ष कैलास कासार , महीला आघाडी तालुकाध्यक्ष सौ रुपाली सोनवणे, धनगर महीला आघाडी अध्यक्षा सौ मिना बिडगर , तालुका कार्याधक्ष विजय खरात , विजय मुन्तोडे , केरनाथ भोसले , रमेश भोसले , तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम , तालुका सरचिटणीस नानासाहेब कदम , गणेश कदम , स्वप्नील कदम , अमोल राखपसरे , सिध्दार्थ खरात , सागर शिंदे , संतोष बर्डे , रोहीत शेळके , आकाश शेळके , पंकज कदम , शुभम शेळके , सूरज कदम , शौरभ शेळके , शामराव कदम , सनी लोंढे , कार्तिक शेळके , योगेश कडलग , भारत गायकवाड , जावेद मणियार , चेतन डोखे , जय कदम , लक्ष्मण कदम , महेश बर्डे , सुरज गोलवड , करण गवळी आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
 
चौकट 
आश्वी परिसरात पालकमंत्री विखे पाटील यांचा दौरा असल्याकारणाने पो नि भांबरे उपस्थित नसल्याने सहाय्यक फौजदार पवार यांनी रिपाईचे निवेदन स्विकारले 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed