संगमनेर | झुंजार न्यूज
राज्य शासनाने नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यात “ शासन आपल्या दारी “ महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला असून अहमदनगर जिल्हयात सुद्धा महसुल मंत्री तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील प्रत्येक तालुक्यातील गावा – गावात “ शासन आपल्या दारी “ उपक्रमाच्या माध्यमातून शिबिरे आयोजित करण्यात येत असून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जात असून नुकतेचं संगमनेर तालुक्यातील पानोडी गावात ” शासन आपल्या दारी ” हा उपक्रम राबविण्यात आला .

आरोग्य विभागाने सुद्धा “ शासन आपल्या दारी “ अभियानात आरोग्याच्या विविध योजना, कार्यक्रम व विविध आजारावर प्रतिबंधात्मक उपयोजनाची माहिती गाव पातळीवर देवून जनजागृती केली .

पानोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवार , मंगळवार , बुधवार या तीन दिवसीय “ शासन आपल्या दारी “ उपक्रम अभियान राबविण्यात आला . जनसेवा विकास मंडळाच्या माध्यमातुन घेण्यात आलेल्या या उपक्रमास सामाजिक कार्यकर्ते भारत शेवाळे , विकास बर्डे यांनी सहकार्य केले तर मंडल अधिकारी श्रीमती वर्षा पवार , ग्रामसेवक ब्राहमणे , तलाठी गडाख , कृषी सहाय्यक स्वप्नील पाटील , महादू खेडकर , आशा स्वयंसेविका सौ शोभा गायकवाड , आरोग्य सेवक तेजस थोरात , सोसायटी कर्मचारी संदिप थोरात आदीनी येणाऱ्या लाभार्थीयांना सहकार्य करत शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वी केला .
Post Views: 146
