संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील मतदार संघातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दाढ खुर्द येथे खडी रोड लगत दाढ फाटा ते भांड वस्ती दलित वस्तीतील स्टेट लाईटच्या अनेक दिवे गेल्या अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत असून दलित वस्तीतील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनास अनेक वेळा तोंडी तक्रार करू नये ग्रामपंचायत प्रशासन याच्याकडे कानाडोळा केला असून सदर सदर स्टेट लाईट असून अडचण नसून कोळंबा अशी अवस्था झाली आहे .

सदर स्टेट लाईट लगत अनेक वस्तू असून या रोडने जाणाऱ्या येणाऱ्या ची रहदारीची संख्या मोठी असून सदर दिवे हे गेल्या अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत असल्यामुळे रात्री या रोडने जाताना शेतकऱ्यांना व नागरिकांना अतिशय भीती वाटते कारण या रोडने ओसाड असल्याने वन्य प्राण्याचे संचार जास्त आहे तसेच या रोडला फॉरेस्ट डोंगर असून या डोंगरावर बिबट्यासारखे डुक्कर सारखे गुड्डू सारखे प्राणी लपून बसतात व सायंकाळी सहा वाजता शिकारीच्या अपेक्षेने रोडला राजरोस फिरताना दिसतात कधीकधी मोटर सायकल यांच्या पाठीमागे पाठलाग करून हल्ला पण करतात असे हल्ले या अगोदर अनेक वेळा झाले आहे तरीही ग्राम पंचायत प्रशासन या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात असा आरोप येथील नागरिकांनी केला असून सदर स्टेट लाईट मुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून या भागामध्ये एक आठवडा रात्रपाळी ची लाईट असून रात्रीची शेतकऱ्यांना शेताला पाणी भरावे लागते अंधारामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये भीतीचे वातावरण झाले असून या रस्त्याची लाईट येत्या पंधरा दिवसांमध्ये दुरुस्ती न झाल्यास ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात व संबंधित ठेकेदार यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा येथील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यांनी दिला आहे
