संगमनेर : झुंजार न्यूज
नांदेड येथील बोनडार गावात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून भीमसैनिक अक्षय भालेराव याची निर्गुण हत्या करणाऱ्या जातीयवादी मानसिकतेच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम यांनी केली आहे

भीमसैनिक अक्षय भालेराव यांच्या हत्येचा आणि बोनस गावातील दलित वस्तीवर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्ष गवई तीव्र शब्दात निषेध करत असून बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून राज्यात बऱ्याच ठिकाणी जातीय दंगली झाले तरी पण हे शासन बघ्याची भूमिका घेत आहे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्यामध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून एका बौद्ध तरुणाची निर्गुण हत्या केली जाते ही निंदनीय आणि महाराष्ट राजाला काळीमा फासणारी घटना आहे या अमानुष घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्ष तीव्र निषेध करत असून दिवंगत अक्षय भालेराव यांच्या मारेकरी पैकी सात जणांना अटक झाली असून उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून हा खटला जलद गतीने न्यायालय चालवावा तसेच दिवंगत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला शासनाने 25 लाखाची आर्थिक मदत तात्काळ द्यावी तसेच त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देऊन त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे व अक्षय भालेराव यांच्या खून प्रकरणातील आरोपांना फाशीची शिक्षा द्यावी कारण पुन्हा असा गुन्हा कोणी करू नये व त्यावर कायद्याचा धाक राहावा तसेच इथून पुढे रिपब्लिकन पक्ष दशतशे उत्तर देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम यांनी म्हटले आहे

सदर निवेदन हे संगमनेर येथील प्रांताधिकारी यांना निवेदन दिले असून सदर निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस किशोर भाऊ वाघमारे जिल्हा सरचिटणीस तुकाराम जाधव सर संगमनेर तालुका अध्यक्ष रमेश राव बनसोडे संगमनेर शहराध्यक्ष राजाभाऊ अहिरे सरचिटणीस गौतम रोहम महिला आघाडीच्या रमाताई पवार रायते गावच्या सरपंच रूपालीताई रोहम तालुका उपाध्यक्ष गोरक्षनाथ बनसोडे बाळासाहेब गायकवाड कार्याध्यक्ष बाळासाहेब मोकळ संजय भोसले सतीश अभंग अशोकराव वैराळ प्रवीण भोसले जालिंदर बोरुडे विजय आडांगळे मिलिंद मोकळ जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव गायकवाड सहसचिव जनार्दन गायकवाड जिल्हा संपर्कप्रमुख शाहीर गेनू बाबा गायकवाड शरद कदम शरद भालेराव भारत गायकवाड रवी मनतोडे विशाल खरात अनिल गायकवाड साळवा वाघमारे शिवाजी कदम अशोक कदम संदीप महं काळे दत्तात्रय वाघमारे गंगाधर जमदाडे विजय भोसले आदिश कार्यकर्त्यांनी सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून निवेदन दिले आहे

