अहमदनगर जिल्हयातील तीन भूमी पुत्रांना तीन वेगवेगळ्या जिल्हाची जबाबदारी !

भाजपा , राष्ट्रवादीनंतर रिपब्लिकन पक्षातही घटनात्मक बदल

शिर्डी | झुंजार न्यूज  

जिल्हा परिषद , महानगरपालिका , लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी पार्टीनंतर केंद्रीय मंत्री ना . रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची संघटनात्मक बदल म्हणून राजकिय दृष्ट्या रामदास आठवले यांनीही आता भाकरी फिरविण्यास सुरुवात केली असून अहमदनगर जिल्ह्याच्या तीन भूमीपुत्रांना आता वेगवेगळ्या तीन जिल्ह्याची जबाबदारी दिल्याने राजकिय वतुळात एकचं चर्चा !

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची नुकत्याचं मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीयअध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कार्यकारीणीची बैठक पार पडली. या बैठकीत अकोले तालुक्यातील तथा राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांची नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदी तर शिर्डी विधानसभा मतदार संघातील बाळासाहेब गायकवाड यांची जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली तर संगमनेर तालुक्यातील श्रीकांत भालेराव यांची अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली.

विजयराव वाकचौरे यांचा मुंबई येथील शालेय जीवनापासून रामदास आठवले यांच्याशी मैत्रीचे संबंध राहिले त्याच्या स्पष्ट वक्ते व दिलदार स्वभावामुळे संपुर्ण राज्यात मैत्रीपुर्ण संबंध निर्माण झाल्याने सातत्याने जनसंपर्क राहिला  तसेच पँथर पासून रिपब्लिकन पक्षाच्या जडण घडणीत ना रामदास आठवले यांच्याशी एकनिष्ठेता ठेवली आठवले यांच्या खास समर्थकांमधील म्हणून त्यांची ओळख आहे . संपूर्ण  जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांना सत्तेचा सहभाग मिळवून देण्यात विजयराव वाकचौरे यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे . तर राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांची देखील अ नगर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदी फेरनिवड करण्यात आली आहे . 
भालेराव यांनी देखील नगर जिल्ह्यात संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून  जिल्हा प्रमुखांना सोबत घेऊन नगर जिल्हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला बनविला आहे. त्यामुळेच ना आठवले यांनी भालेराव यांचेवर पुन्हा जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे . 

 तर शिर्डी विधानसभेतील आश्वी येथील रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड यांची जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे . बाळासाहेब गायकवाड हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व असल्याने सर्व पक्षातील त्यांचे चांगले संबंध आहे . ते पक्षाचे अनुभवी वक्ते असून त्यांच्यातील रुबाबदार वक्तृत्व, नेतृत्व जळगाव जिल्ह्यासाठी  राजकीय दृष्टीने पूरक ठरणार असल्याने त्यांची देखील जळगाव जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे .तर  भुसावळ येथील रमेश मकासरे यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या बैठकीस आरपीआयचे राज्याध्यक्ष राजाभाऊ सरोदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, सरचिटणीस गौतम सोनवणे, परशुराम मोरे, सूर्यकांत वाघमारे, शहाजी कांबळे, दक्षिणनगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे , उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनातील असणारा रिपब्लिकन पक्ष हा देशातील कानाकोपर्‍यात पोहचविणारे केवळ रामदास आठवले यांनीचं हि किमीया करुन दाखवल्याने आज आठवले यांच्या रिपाई कडे संपूर्ण जाती – धर्माचे महीला – युवक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याने या पक्षाला आता खरोबर राजकिय सत्तेचे भविष्य निर्माण झाले आहे या पक्षात प्रामाणिक काम करणाऱ्यांला खरोखर न्याय मिळतो 

विजयराव वाकचौरे ( प्रदेश उपाध्यक्ष , रिपाई ) 

 

लवकरचं या तिन्ही नेत्यांचा मोठी जाहीर सत्कार आश्वी येथे होणार असून आता खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्ष्यांला संजीवनी येणार  

 

महेश्वर गायकवाड ( संरपच , आश्वी बु ” )

ल व

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *