संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील असणार्या पश्चिमेकडील लगडदरा व पुर्वेकडील पिंपळदरा पाझर तलाव दुरुस्तीकरिता महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने अनुक्रमे २६ व ९ लाख रुपयेचा निधी मंजूर झालेल्या पाझर तलाव दुरुस्ती कामाचे कार्यकर्त्यासह ग्रामस्थांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला .

लगडदरा व पिंपळदरा हे पाझर तलाव गावांच्या दक्षिणेस असल्याने या दोन्ही पाझर तलावाचा मोठा फायदा गावाला होतो पाझर तलाव भरल्यास वर्षभर गावांला पाणी पुरते मात्र पाझर तलावाला बरेचं वर्ष झाल्याने या तलावा गळती लागल्याने कार्यकर्त्याच्या मागणीनुसार महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी खास बाब म्हणून लगडदरापाझर तलावास जीएसटी , रॉयल्टी धरुन २६ लाख रुपये तर पिंपळदरा पाझर तलावास जीएसटी , रॉयल्टी धरुन ९ लाख रुपये मंजूर झाल्याने कार्यकर्त्यासह ग्रामस्थानी महसूल मंत्री विखे पाटील यांचे आभार मानले .

पाऊस सुरु होण्यापुर्वी हे दोन्ही पाझर तलाव दुरुस्त व्हावे या ग्रामस्थांच्या मागणीनुसार तातडीने कामाचे शुभारंभ करत कामास सुरुवात करण्यात आली यावेळी जनसेवा कार्यालयांचे आधिकारी डॉ संजय कहार , जलसंपदा आधिकारी ए एम मुळे , ठेकेदार गोरख कर्पे , माजी उपसंरपच नानासाहेब शिंदे , अशोकराव तळेकर , ग्रा प सदस्य संजय जाधव , सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव , माजी पोलिस आधिकारी भाऊसाहेब चव्हाण , रंगन्नाथ मुंढे , नय्युम सय्यद , प्रा रामनाथ पवार , भारतराव शेवाळे , दिपक जाधव , पांडूरंग सांगळे , अशोक सांगळे , रमेश मुंढे , राजू मुंढे , अरुण यादव , राम घुगे , रिपाई तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम , पोपट कदम , धोडीबा कदम , मारुती डोंगरे , बन्सी बर्डे , बाबुराव गोलवड आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .

चौकट
पाझर तलावाच्या बांधावर मोठ्या प्रमाणात झाडे – झुडपे तयार झाली होती ती पुर्ण साफ करण्यात आली तर पाण्याचा पाझर होवू नये म्हणून तलावाचा खोली घेवून प्लास्टिक कागद टाकण्यात येणार असल्याचे जलसंपदा कर्मचारी मुळे यांनी सागितले .
Post Views: 200
