संगमनेर | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील चनेगाव येथे माजी महसूल मंत्री माननीय आमदार बाळासाहेब थोरात गटाच्या स्वाती विजय गुळवे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली

निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच खेमनर होते याप्रसंगी निवड करण्यासाठी गावच्या विद्यमान ग्रामसेविका श्रीमती पठारे उपस्थित होत्या मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये थोरात गटाने स्पष्ट बहुमतासह जागा निवडून आणले असून चनेगाव ग्रामपंचायत वर थोरात गटाचे वर्चस्वासन माजी महसूल मंत्री थोरात यांच्या माध्यमातून चणेगाव गावामध्ये अनेक विकास कामे मार्गी लागले असून यापुढील काळामध्ये थोरात यांच्या माध्यमातून चनेगाव ग्रामस्थां -साठी विविध योजनेच्या माध्यमातून निधी आणला जाईल अशी ग्वाही नवनिर्वाचित उपसरपंच स्वाती गुळवे यांनी निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या

याप्रसंगी गावचे प्रमुख कार्यकर्ते शेतकरी विकास मंडळाचे नेते शहाजीराजे खेमनर दत्तात्रय लोहाळे माजी उपसरपंच राजेंद्र खेमनर शंकर हजारे चेतना लोहाळे सुनीता दिघे ढमक भाग्यश्री खेमनर गोरख पवार पिनूताई दिघे संजय गुळवे हौशीराम डमक सुभाष दिघे अण्णा गुळवे नाथाभाऊ गुळवे रोशन गुळवे आबा गुळवे गुड्डू खेमनर रामा भोसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
