संगमनेर | झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या खळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने गावातील आशा स्वयंसेविका सुनीता नागरे व चकोर वाडी येथील अंगणवाडी सेविका ललिता चकोर यांना नुकताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 2023 देऊन ग्रामपंचायत कार्यालय येथे गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच विलास गजानन वाघमारे व उपसरपंच राजहंस दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र पाटील चकोर ग्रामसेवक अनिल माधव वाणी व ग्रामपंचायत सदस्य सचिन आव्हाड यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला .

 या दोन्ही सेविका खळी गावातील चकोरवाडी व कांगणवाडी या परिसरामध्ये कोरोना काळामध्ये कोणतीही भीती न बाळगता कोरोना ने आजारी असलेल्या रुग्णांना सेवा देऊन जीवदान दिले असून कोरोना काळामध्ये आदर्श काम केल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने व गावातील नागरिकांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना अहिल्यादेवी पुरस्काराने सन्मानित केले आहे .

 अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य श्रेष्ठ असून गावोगावी अहिल्यादेवी होळकर यांनी पाणी आडवा पाणी जिरवा व बारावा बांधणे असे अनमोल कार्य केल्यामुळे आज गावोगावी राज्य शासनाच्या माध्यमातून जलसंधारण विभागामार्फत पाणी आडवा पाणी जिरवा कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्यामुळे गावोगावी शेतीच्या पिकाचे व पिण्याचे पाण्याचे प्रश्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यामुळे सुटला आहे त्यामुळे अशा आदर्श माताला खळी गावातील सर्व नागरिकांनी अभिवादन करून जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली व या जयंती मध्ये गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed