कोपरगांव | झुंजार न्यूज

सहानुभुती ही कधीही कुठेही मिळत नसते, तर ती अगोदर आपल्यातील गुणांनी तयार करावी लागते. चांगलं ते जगाला द्यावं आणि त्यातुन आपणही पुढे जात रहावं हा मौलीक संदेश सर्वासाठी लागु आहे. खुल्या अर्थव्यवस्थे – मुळे आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेतून स्वतःला ओळखण्याची संधी सर्वांना प्राप्त झाली आहे. खुल्या स्पर्धा हे एक आव्हान आहे. त्या आव्हानाला सामोरे जातांना प्रत्येक घटकांचा अभ्यास करावा लागतो. त्यातुन निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी नव नविन उपाययोजना आखाव्या लागतात त्या कधी यशस्वी होतात तर कधी अपयश पदरी पडते. अपयशाने खचुन न जाता पुढे जात राहणं हीच प्रेरणा असुन त्यातून स्वतःबरोबर जग घडवायला मार्ग सापडत असतो. हे सगळे कलात्मक गुण संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा शंकरराव कोल्हे यांच्यात आहेत. त्यांचे वडील माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करत कोपरगांव सारख्या जिरायती भागातील शेतक-यांचे प्रश्न समजुन घेत १९६० साली सहकाराची मुहूर्तमेढ संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमांतून रोवली आहे त्यांच्या कडुनच बिपीनदादा कोल्हे यांना सामाजिक कार्याचे बाळकडू मिळालेले आहे.

२१ जुन हा बिपीनदादा कोल्हे यांचा वाढदिवस. या दिवसाला विशेष महत्व आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जुन या दिवसाला अनोखे महत्व प्राप्त करून घेतले आहे. जागतिक योगा दिन म्हणून त्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवली आहे. योगामुळे सर्वांचेच आरोग्य चांगले राहते. शालेय जीवनापासून त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली, ती त्यांनी आयुष्यभर पुढे नेली आहे. कोपरगाव तालुका पंचायत समितीचे सभापती पासून त्यांनी दिल्ली स्तरावरील विविध शासकीय निमशासकीय संस्थांचे प्रतिनिधित्व करत शेतकऱ्यांच्या जीवनात अधिक अधिक समृद्धी कशी होईल याचाच जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.

बिपिनदादा कोल्हे हे सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असून त्यांनी येसगांवसह संपुर्ण मतदार संघात जनसामान्यांच्या भल्यासाठी जे जे उपक्रम राबविले आहेत ते ते अत्यंत नाविन्यपुर्ण आहेत. त्यांना येथील प्रत्येक रहिवासीयांच्या प्रश्नाची जाण आहे. सातत्याने नाविन्यपुर्ण ध्यास त्यांच्या ठायी आहे. वारकरी त्याच्या ईश्वराला पंढरीच्या पांडुरंग रुक्मीणीच्या रूपात पाहत असतो तद्वत येथील जनतेला बिपीनदादा कोल्हे हे जनसेवेचे वारकरी वाटतात.

कोपरगांव तालुक्यासह सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आलेल्या प्रत्येक संकटात त्यांच्यासह कोल्हे कुटूंब मदतीला धावुन जातेय हे विशेष. कोपरगांव तालुका पंचायत समितीच्या सभापती पदाची धुरा त्यांना ऐन तारुण्यात मिळाली. त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून दाखविले. ग्रामिण भागात शिक्षणाचा स्तर नेहमीच खालावलेला असतो. तालुक्याचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी त्यासाठीच्या पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला त्याचबरोबर मुला मुलींसह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यांची व्यवस्था केली.

संगणक क्रांती ही तंत्रज्ञान क्षेत्रातील गरजेची बाब असून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना हे तंत्रज्ञान शिकायला मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी संजीवनी ई-बस ची संकल्पना राबवुन ती प्रत्यक्ष कृतीत आणली. त्यामुळेच येथील ग्रामिण भागातील विद्यार्थी हा शहरी भागातील विद्यार्थ्याशी बरोबरी करतांना दिसत आहे.
बिपीनदादा कोल्हे हे समयसुचकतेचे नेतृत्व असुन त्यांनी काळाचे भान ओळखून त्यानुरूप कृती आराखडयावर भर देत कोपरगांव विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी वेळीच पावले उचलुन त्याच्या अमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. इतरांच्या तुलनेत येथे काय काय सोयी सुविधांची आवश्यकता आहे त्याचा तौलनीक अभ्यास करून से साध्य करण्यावर भर देतात.

नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा प्रादेशिक पाणी प्रश्नाच्या वादात उर्ध्व गोदावरी खोऱ्यात पाण्याची समृद्धी निर्माण करण्यात बिपिनदादा कोल्हे सातत्याने पुढाकार घेऊन काम करत असतात. पाणी प्रश्नासाठी त्यांनी अनेक लढे दिले आहेत. पश्चिम वाहिनीचे पाणी पूर्वेकडे वळवा ही माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांची मागणी बिपिनदादा कोल्हे यांनी पुढे लावून धरत त्यावर केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. बारमाही गोदावरी कालवे आणि लाभ धारक शेतकरी हे नातं अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम यशस्वी करून दाखवला.
पर्यावरण हा त्यांचा आवडता विषय असून (जागतिक तपमान वाढ) भूवैष्मीकीकरणामुळे पर्जन्यमानाचे प्रश्न निर्माण झाले आहेत त्यावर झाडे लावून देश वाचवा हा नारा देत त्यासाठी प्रत्यक्ष अंमलबजावणी त्यांनी केली. ते शाळा महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यापासून वृक्ष लावून त्याची जपवणुक करतात याशिवाय ते त्यांचा प्रत्येक वाढदिवस झाडे लावूनच साजरा करतात. निसर्गचक्र बदलत्या भूवैष्मीकीकरणामुळे सातत्याने बदलत आहे त्याचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे क्रमप्राप्त आहे. कोपरगांव विधानसभा मतदार संघासह प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात वृक्षारोपणावर त्यांचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. मतदार संघातील रस्त्यांच्या दुतर्फा त्यांनी हिरवाई फुलवलेली आहे.

आज गोर गरीब हुशार मध्यमवर्गीय मुला मुलींना शिक्षण घेतांना सतत काही ना काही अडचणीचा सामना करावा लागतो यासाठी ते गेल्या १० ते १५ वर्षापासुन त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसाला हार, तुरे, पुष्पगुच्छ (शाल श्रीफळ) याचा स्विकार न करता हुशार मुलांना मोफत शालेय शिक्षणासाठी वहयांचे वाटप सुरू केले आहे. एका वहीची किंमत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्यांना आहे. दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कारात ते स्वतःचा वाढदिवस साजरा करतात. याशिवाय सर्वरोगनिदान आरोग्य शिबीरासह मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया हा उपक्रम ते प्रत्येक वाढदिवसाला राबवितात. कार्यकर्त्यांनाही हार तुरे सत्कारावर पैसे न खर्च करता त्यातुन गरीब मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करा हे त्यांचे नेहमीचं सागणं असतं.

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी उच्च व तांत्रीक शिक्षणावर भर दिला असुन तोच पायंडा बिपीनदादा कोल्हे यांनी पुढे सुरू ठेवला आहे. आपल्या ग्रामिण भागातील खेळाडू क्रिडा क्षेत्रात चमकले पाहिजे यासाठी गांवपातळीपासुन ते थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कीडा स्पर्धाना प्राधान्य देवुन त्यानुरूप खेळाडू घडविण्यावर त्यांचा भर आहे. त्यासाठी सर्व खेळातील नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन ते विनामुल्य उपलब्ध करून देतात.
आज सहकारी साखर कारखानदारीसमोर खाजगीचे आव्हान उभे राहिले आहे. त्यातुलनेत सहकाराने काय केलं म्हणजे स्पर्धेत टिकुन राहता येईल याचा अभ्यास करून त्यानुरूप धोरणे ते ठरवत असतात. तंत्रज्ञान पुढे गेलं आहे त्याचा जाणीवपुर्ण अवलंब सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत केला जात आहे त्यापाठीमागच्या यशाचे धनी बिपीनदादा कोल्हे व त्यांचे आधुनिक विचार आहेत.

 


परोपकार हा त्यांच्या ठायी नसा नसा मध्ये भरलेला आहे. कितीही घाईचे आणि महत्वाचे काम असले आणि प्रवास करतांना कुणी अपघाताने जखमी झाला तर त्याला क्षणाचाही विलंब न करता मदत करणं हे बिपीनदादा कोल्हे यांचे खास वैशिष्टय आहे. रात्री अपरात्री ग्रामिण भागात शेतकरी बांधवासह मध्यमवर्गीय, कुणीही आजारी पडला आणि त्याने मदतीसाठी मध्यरात्री जरी फोन केला तरी त्यावर कार्यवाही करून संबंधीतांचे प्राण वाचविण्यांत त्यांचा हातखंडा आहे. कित्येक अपघातग्रस्तांना त्यांनी वेळेवर वैद्यकिय मदत मिळवून देवुन जीवदान दिले आहे. हाच आर्शिवादाचा वरदहस्त त्यांच्या कुटूंबावर आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुहाची स्थापना केली तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी तो जपला त्यात वाढ करण्यात बिपीनदादा कोल्हे हे नाविन्यपुर्णतेचा ध्यास घेवुन अहोरात्र काम करतांना दिसतात. त्यांच्याप्रमाणे त्यांची पुढची पिढी मुलं देखील हुशार आहेत., नुकतीच श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली त्यात विवेक कोल्हे यांनी आपल्या नेतृत्वाची चूनुक दाखवत सभासद शेतकऱ्यांच्या सहकार्याने गणेशची सत्ता परिवर्तन करून दाखवली. बिपीनदादा कोल्हे यांना ईश्वर समाजकार्याचा वसा पुढे चालविण्यासाठी दिर्घायुष्य प्रदान करो हिच अपेक्षा.

रमेश घोडेराव,
उपाध्यक्ष, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (कोपरगाव)

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *