संगमनेर / झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील देवकौठे गावचे भूषण तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक,युवक काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष व शामप्रो संस्थेचे व्हा.चेअरमन इंजी.सुभाषराव सांगळे यांना आज सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे सामाजिक क्षेत्रात तसेच बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वंजारी सेवा संघ दशकपूर्ती सोहळा व संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणी लॉन्स याठिकाणी उदगीर लातूरचे आमदार गोविंदराव केंद्रे व येवल्याचे आमदार नरेंद्र दराडे यांच्या शुभहस्ते यंदाचा युवा समाजसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.गोविंदराव केंद्रे,येवलाचे आमदार नरेंद्र दराडे,आर्किटेक बी.आर.चकोर,युवा नेते उदय सांगळे, नाशिक जि.प.माजी अध्यक्ष शितल सांगळे,बीडचे दादासाहेब मुंडे,व्ही.एन नाईक शिक्षण संस्था नाशिकचे हेमंत धात्राक,कोंडाजी मामा आव्हाड, व्ही.एन.नाईक संस्था नाशिकचे अध्यक्ष- पंढरीनाथ थोरे,सिन्नर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ,जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार,अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे,ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल संस्थेचे अध्यक्ष पांडूशेठ केदार,नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर अशोकराव मुर्तडक,विनायकराव शेळके,हरिभक्त परायण राधाताई सानप,बीड,हरिभक्त लुटे महाराज,धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप नाना कर्पे,सामाजिक कार्यकर्ते बंडू नाना भाबड,बाप कंपनीचे रावसाहेब घुगे,शामराव गीते,नितीन सांगळे,मारुतीशेठ उगले,तुकाराम सांगळे,बाजी दराडे,नामदेव सानप,वंजारी सेवा संघ दर्शकपूर्ती सोहळा व संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळ यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व वंजारी समाज मोठ्या संख्येने या पुरस्कार कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
इंजी.सुभाषराव सांगळे यांना राज्यस्तरीय युवा समाजसेवक पुरस्कार पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
