आश्वी / झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील असणार्या शिबलापूर – पानोडी रस्त्यालगत राहणाऱ्या भिमराज सांगळे यांच्या घरातून दुपारी १ वाजल्याच्या सुमारास साडे बारा तोळे सोनं व बावन्न हजार रोख रक्कम धाडसी चोरी झाल्याने शिबलापूर परिसरात मोठी खळबळ झाली असून याबाबत आश्वी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल .
याबाबत मिळालेली माहिती अशी की , भिमराज सबाजी सांगळे यांचे घर शिबलापूर पासून अर्ध्या कि मी अंतरा असून मुलं शिक्षण – नोकरी निमित्ताने बाहेर असल्याने दोघेचं नवरा – बायको शिबलापूर – पानोडी रस्त्यालगत वस्तीवर राहतात . सोमवारी सकाळी भिमराज सांगळे हे नाशिक येथे गेले होते तर त्यांची पत्नी ह्या लिंबाच्या बागेत साडे बाराच्या सुमारास लिंब गोळा करण्यासाठी गेले त्यानंतर तीन सव्वा तीनच्या दरम्यान घरी आल्या असा त्यांना घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा दिसला . आपल्या घरी कोणीचं नाही मग दरवाजा कोणी उघडला ही शंका आल्याने त्यांनी तातडीने घरात जावून बघितले असता बेडरुम मधील कपाट उघडे होते त्यातील लॉकर सुद्धा उडले दिसले लॉकरमध्ये ठेवलेले पिकामधून आले पैसे ५० हजार रोख रक्कम व साडे बारा तोळे सोने गायब दिसले त्यांनी तातडीने भिमराज सांगळे व संतोष सांगळे यांना ही माहिती दिली त्या माहिती वरुन आश्वी पोलिस स्टेशनला झालेल्या धाडसी चोरी खबर देण्यात आल्याने क्षणाची विलंब न करता पो नि संतोष भंडारे यांच्यासह पो हे कॉ शिंदे , पवार , पारधे , आनंद वाघ व विनोद गंभीर घटनास्थळी दाखल झाले .
घटनेची गंभिता ओळखून अहमदनगर येथून श्वान / मुद्रा तज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले सायंकाळी साडेसात वाजता नगर आलेल्या श्वान पथकांनी शिबलापूर – आश्वी दिशेला चोरानी पलायन केल्याचे निदर्शनात आणून दिले . पो नि संतोष भंडारे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे
