संगमनेर / झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे झालेल्या ग्रामसभेत संध्या गावात असणार्या कुकुटपालन करणार्या व्यवसायाकडून पोर्टी फॉर्मची व्यवस्थितपणे निगा राखली जात नसल्याने निर्माण होणार्या दुर्गधी व माशेनी लोक हैराण झाल्याचे चित्र दिसत असल्याने या पोर्टी फॉर्मच्या चालकावर त्वरीत कारवाई करण्याची प्रामुख्यानी मागणी ग्रामसभेतून होवून सर्व विषयावर खेळीमेळीच्या वातावरण चर्चा होवून जलजीवन , सौर उर्जा व हांगणदारी मुक्त गांव सर्वानुमते ठराव घेण्यात आले .
‘ हर घर हर नळ ‘ या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या संकल्पनेतील जलजीवन मिशन योजना पानोडी गावांकरिता ४ कोटी ८३ लाख १५ हजार रुपये मंजूर झाल्याने गावासह वाड्या – वस्त्यांवर प्रत्येकांच्या दारापुढे नळ योजनाकरिता ग्रामसभा घेण्यात आली होती . ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी संरपच गणपत हजारे हे होते तर माजी उपसंरपच अशोकराव तळेकर , रावसाहेब घुगे , सोसायटी चेअरमन बबनराव कराड , नानासाहेब शिंदे , विक्रम थोरात , गणेश कदम , महादू खेडकर , दिपकराव जाधव , भारतराव शेवाळे , जालिंदर तळेकर , पुंजा पाटील नागरे , होशाभाऊ जाधव , भोऱ्या सय्यद , दत्तू दिघे , ग्रामसेवक सुरेंद्र ब्राहमणे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी ग्रामसेवक ब्राहमणे यांनी जलजीवन पाणी पुरवठा योजना विस्तुतकरण , गांव हागणदारी मुक्त , सौर उर्जा प्रकल्प या प्रमुख विषयाची मांडणी करत शासनाच्या मंजुरीसाठी त्वरीत ठराव करण्यात आले . तर संध्या गावामध्ये असणार्या कुकटपालन व्यवसायामाध्यमातून काळजी न घेतल्याने संपुर्ण वाड्या वस्त्या व गावांमध्ये दुर्गधी व मासेच्या थैमान झाल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे लोकांनी ग्रामसभेत याबाबत व्यथा मांडल्या . या कुकुटपालन चालकांनी कोबड्याकरिता मोठा खड्डा घेतला का ? कुकुटपालन व परिसरात दुर्गधी व मासेच्या नायनाटी करिता फवारणी मारली का ? या गोष्टीची ग्रामपचायतीनी पाहणी केली पाहिजेल जो या गोष्टी टाळत आहे अशा लोकाचे कुकुटपालन बंद करावे अशा अनेक प्रश्न ग्रामस्थानी उपस्थित करत दुर्गधी व मासेपासून आम्हाला मुक्त करावे अशी मागणी केली .
ग्रामस्थांनी मासेचे फोटो दाखवून दुर्गधी व मासेपासून किती त्रास होते हे सागितल्याने या गोष्टीची दखल घेवून योग्य ती कारवाई केली जाईल असे संरपच व ग्रामसेवकांनी सागितले .
