संगमनेर / झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील प्रास्तावित वाळु डेपोला ग्रामसभेत ग्रामस्थांनी आक्रमक होत वाळु डेपोला विरोध करत मागील दिलेला ठराव ही रद्द करण्यात आला .
जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामा ची ग्रामस्थांना माहीती व्हावी यासाठी आश्वी बुद्रुक बाजारतळावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते . या वेळी विविध विषयांवर चर्चा सुरु असतांना ऐन वेळी वाळु डेपो संदर्भातील आलेल्या विषयावर कामगार तलाठी भालचिम डी बी माहीती देत असतांना ग्रामस्थ आक्रमक होत गावाचे वाळवंट करायचे काय असा प्रश्न उपस्थित करत आश्वी बुद्रुक नदीपात्रातुन या पुढे वाळुचा एक खडाही उचलु न देण्याचा निर्धार केला . राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री झाल्यानंतर वाळु माफीयांचा जाचातुन सर्व सामान्य जनतेची होणारी लुट तरुणांचा वाळूतस्कंरीतून व्यसनाधीनता व गुन्हेंगारीत वाढलेला सहभाग थांबविण्यासाठी ६०० ब्रास ने शासकीय डेपोतून वाळु देण्याचे धोरण राबविले या धोरणाचे आश्वी बुद्रुक ग्रामस्थांनी स्वागत करत वाळु उपशास परवांनगी दिली असता जलसंपदा विभागाच्या मोकळ्या जागेत साडेतीन हजार ब्रास वाळु प्रवरा नदीपात्रातुन उपसुन डेपो सुरु करण्यात आला मात्र या डेपोतून घरकुलाला प्राधान्य क्रम देत अकोला, संगमनेर, राहता, राहुरी तालुक्यातील घरकुलांना वाळु देत नंतर सर्व सामान्य जनतेसाठी वाळु खुली केली मात्र वाळु बुकींग ही संगमनेर येथील सेतु कार्यालयातून केल्याने ती त्वरीत संपल्याचे जाहीर करण्यात आल्याने आश्वी बुद्रुक ग्रामस्थांना वाळु डेपोतून वाळु मिळाली नाही .या मुळे ग्रामस्थांन मध्ये संतापाची लाट होती .याच दरम्यान आज झालेल्या ग्रामसभेत दुसर्या टप्प्यातील वाळुडेपोतुन आठ हजार ब्रास वाळुउपसा होणार असल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होउन वाळु उपशास कडाडुन विरोध करण्यात आला.
या वेळी ग्रामविकास आधिकारी राकेश पाटील,प्रशासक आर आर ठाकुर, तलाठी डी बी भालचिम उपस्थित होते.
