संगमनेर । झुंजार न्यूज
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष हा तळागाळातील लोकांसाठी काम करणारा पक्ष असून तरुणांसह महिला ही या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून आगामी होणार्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गांव तेथे रिपब्लिकन शाखा उभी करणार असे आवाहन तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी केले .
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची पठार भागाची महत्वपूर्ण बैठक घारगाव या ठिकाणी पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक शरद तपासे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीमध्ये पक्ष वाढीसाठी गाव तेथे शाखा हे धोरण अवलंबून सर्वसामान्य जनतेचे ग्रामीण भागातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. महिलांच्या बाबतीत ज्या काही शासकीय योजना आहेत त्यांचा लाभ मिळवून दिला पाहिजे. अन्याय अत्याचाराच्या विरोधात खंबीरपणे पक्षाची भूमिका मांडली पाहिजे. ग्रामीण स्तरावरील प्रश्न तालुकास्तरावर वरिष्ठ कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून ते सोडवले पाहिजे, अशा अनेक प्रकारच्या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीसाठी तालुकाध्यक्ष आशिष शेळके, तालुका कार्याध्यक्ष विजय खरात, तालुका सरचिटणीस सिद्धार्थ खरात, युवक पठार प्रमुख, सागर शिंदे, मराठा आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम वर्पे, लक्ष्मण मेढे, दीपक खरात , रमेश तपासे , राजू वाघमारे , योहान मिसाळ , योगेश कर्डक, खेमनर , प्रमोद भोसले , भरत भाऊसाहेब माळी, बाळासाहेब भालेराव, युवराज खरात , प्रकाश भोसले , संभाजी भोसले , दिनकर खरात सोपान मेंगाळ , रमेश जाधव , टी. दुधवडे , शांताराम शिरसाट , संतोष शिंदे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
Post Views: 653
