मुंबई । झुंजार न्यूज 

 

इर्शाळवाडीतील घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. मात्र, माळीण, तळीये, इर्शाळवाडी… ही यादी वाढू नये, असं सरकारला वाटत असेल, तर वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आ सत्यजीत तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला ..

माळीण दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने आणि तळीये दुर्घटनेनंतर राज्य सरकारने स्थापन केलेल्या समित्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष काय आहेत, त्या समित्यांनी काही शिफारशी केल्या का, असतील, तर त्या अमलात आल्या का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आपत्ती घडून गेल्यानंतर त्याचं व्यवस्थापन करण्याच्या कलेपेक्षा आपत्ती टाळण्यासाठी काही पावलं उचलता आली, तर ते जास्त उपयुक्त ठरेल. दरड कोसळण्यासारख्या घटनेत फक्त माणसांचे जीव जात नाहीत, तर त्यांचं घरदार उद्ध्वस्त होतं. त्यांचं पुनर्वसन करावं लागतं. या माणसांची मुळं त्यांच्या जमिनीत घट्टं रुजलेली असतात. त्यांना दुसरीकडे रुजवणं हेदेखील क्रूर आहे. त्यामुळे अशा घटना अपवादात्मकच असाव्यात, पर्यावरणाशी फारत घेऊन होणाऱ्या विकासामुळे या घटना नियम ठरू नयेत, या दृष्टीने आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed