संगमनेर । झुंजार न्यूज 

 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा डॉ. राजेंद्र शरद जोरवर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्राप्त झाली आहे.

डॉ राजेंद्र जोरवर हे थोरात महाविद्यालयात मराठी विषयाचे विभाग प्रमुख  असून ते सातत्याने विविध उपक्रमांमध्ये सहभाग होत असतात. विद्यार्थी प्रिय असलेल्या डॉ राजेंद्र शरद जोरवर यांनी संगमनेर महाविद्यालयाच्या मराठी विभागातून प्राध्यापक डॉक्टर राहुल हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमिक चळवळीतील कार्यकर्त्यांची आत्मकथने एक अभ्यास हा प्रबंध सादर केला होता यावेळी अंतिम ऑनलाईन मौखिक परीक्षेत त्यांचे बहिस्थ परीक्षण डॉ तुकाराम रोमटे, डॉ कल्पना मेहरे, डॉ सदाशिव सरकटे आदींनी परीक्षण केले.

डॉक्टर जोरवर यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड समन्वयक डॉ अशोक लिंबेकर, डॉ बालाजी यांनीही मोलाचे सहकार्य केले .तर डॉ शिरीष लांडगे, डॉ दिलीप पवार व डॉ रावसाहेब ननावरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

डॉ जोरवर यांच्या यशाबद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजीत भाऊ थोरात ,कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, रजिस्टर आचार्य बाबुराव गवांदे, सहसचिव दत्तात्रय चासकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिनानाथ पाटील ,उपप्राचार्य डॉ बाळासाहेब वाघ आदींसह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *