संगमनेर । झुंजार न्यूज  

निसर्गाला बोलते करणारे, मातीचे गाऱ्हाणे मांडणारे ज्येष्ठ कवी आणि माझे स्नेही ना. धो. महानोर यांचे जाणे मनाला अतिव वेदना देणारे आहे.

‘ना.धों.‘शी जेव्हा जेव्हा भेटणे व्हायचे, तेव्हा महाराष्ट्राच्या पीक पाण्यावर, संस्कृतीवरून आणि पुरोगामी चळवळीवर गप्पा व्हायच्या. आयुष्य समृद्ध करून टाकणारी ती मैफिल असायची.

काही दिवसांपूर्वीच मी नाधोंच्या गावी गेलो. तब्येत थकल्यासारखी जाणवत होती, पण उत्साह मात्र कमालीचा होता. अनेक नव्या पुस्तकांबद्दलची माहिती त्यांनी मला दिली. शेतीतल्या नव्या प्रयोगांबद्दल ते भरभरून बोलले.

‘ना.धों.‘वर प्रेम करणारे, त्यांचे साहित्य वाचून मोठे झालेले आणि त्यांच्या लेखणीने प्रभावित झालेले अनेक विद्यार्थी आज पोरके झाले आहे.

– बाळासाहेब थोरात ( माजी महसूल मंत्री तथा कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते )

पळसखेडे ता. सोयगाव, जिल्हा औरंगाबाद येथील त्यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी जानेवारी 2023 मध्ये त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील साहित्य परंपरा, राजकारण व समाजकारण यावर शेवटी चर्चा झाली .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *