संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी गावांतील ग्रामपचायतीसह विविध संस्था , थोरात विदयालय व प्राथमिक शाळेत विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहन करुन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायत प्रांगणातील ध्वजारोहण सेवानिवृत्त सैनिक बाळासाहेब हजारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संरपच गणपत हजारे , माजी सैनिक छबू हजारे , ग्रामसेवक सुरेंद्र ब्राहमणे आदीसह अंगणवाडी सेविका , आशा सेविका , शिक्षक , ग्रामपयायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन ज्या वीरांनी भारत माते करिता बलिदान दिले . अशा शहिद जवान , पोलिस या वीरांना अभिवादन म्हणून ग्रामपचायत कार्यालयाजवळ शिलाफलकांचे अनावरण माजी सैनिकाच्या हस्ते करण्यात आले .
Post Views: 674
