नाशिक । झुंजार न्यूज
राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे नाशिक विभागाकरीता दोन इलेक्ट्रिक बस प्राप्त झाल्या आहेत. नाशिक-पुणे मार्गावर या ‘शिवाई’ बस धावणार असून, प्रवाशांची अनेक महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. टप्प्याटप्प्याने नऊ बस नाशिक विभागाकरीता मिळणार असल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली
इलेक्ट्रिक बसचे वैशिष्ट्ये
– चालकाला डुलकी आल्यास या बस अलर्ट पाठवून सतर्क करतात
– या बस वातानुकूलित सुविधायुक्त
– बसमध्ये कॅमेऱ्यांची सुविधा
– हे कॅमेरे बसमधील हालचालींसह नियंत्रण कक्षाला रिअल टाईम फीड देणार
– बस आणि कंट्रोल रूममध्ये परस्पर संवादाची सुविधा
– प्रत्येक प्रवाशाकरीता रीडिंग लॅम्प आणि चार्जिंग पोर्टची सुविधा
– दीड तासांच्या चार्जिंगमध्ये बस धावणार ३५० किलोमीटर
– बसमध्ये प्रवासी घोषणा प्रणाली व अॅन्ड्रॉइड टीव्ही
– बसमध्ये प्रगत ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम
सवलत योजनेचा लाभ मिळणार
सरकारकडून बस प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलत योजना ‘शिवाई’ बसमधून प्रवास करणाऱ्यांनादेखील लागू असणार आहे. या बसचे नाशिक ते पुणे प्रवास भाडे ४७५ रुपये प्रति प्रवाशी इतके असणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक यांना बस प्रवासात सवलत योजना लागू असून, अर्ध्या तिकीटासाठी प्रवाशांना २५५ रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
