विद्यार्थ्यांचे विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम

संगमनेर । झुंजार न्यूज

1857 च्या उठावापासून सुरू झालेल्या स्वातंत्र्य युद्धाने स्वातंत्र्यप्राप्तीचे विविध टप्पे पाहिले. 9 ऑगस्ट 1942 च्या क्रांती दिननात देशातील सर्व जनता सहभागी झाली.स्वातंत्र्य ही लोक चळवळ झाली. त्यात अनेक राष्ट्रपुरुष व स्वातंत्र्यसैनिक यांनी केलेल्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले असून प्रत्येक देशवासीयाने लोकशाही व देशाची एकात्मता टिकवण्यासाठी कटिबद्ध राहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी केले असून विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहाच्या वतीने आयोजित 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत कारखान्याचे संचालक मीनानाथ वरपे, डॉ.तुषार दिघे,संभाजी वाकचौरे, माणिकराव यादव, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,किरण कानवडे, रामदास तांबडे, शरद गुंजाळ, प्रा.विवेक धुमाळ आदींसह विविध खाते प्रमुख, पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधले. यामध्ये विद्याभवनच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली गणेश वंदना व कन्या विद्यालय घुलेवाडी येथील विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर देश रंगीला या गीतांना उपस्थित विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली. अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व इंटरनॅशनल स्कूलच्या अनोखा भारत, महात्मा फुले विद्यालयाची स्त्रीभ्रूण हत्या या थीमवर असलेली फ्युजन सॉंग लक्षवेधी ठरली.

तर विद्याभवन च्या शिवतांडव गोंधळाने सर्वत्र एकच जल्लोष निर्माण केला. मॉडेल स्कूलचे आदिवासी नृत्य ,इंटरनॅशनल स्कूलचे मंगळागौर, तंत्रनिकेतनचे वंदे मातरम फ्युजन सॉंग ,डी फार्मसी महाविद्यालयाचे देशभक्तीपर फ्युजन सॉंग, आणि बी फार्मसी चे राष्ट्रीय एकतावरील रिमिक्स गाणे सर्वांच्या अंगावर शहारे आणले.

कार्यक्रमाच्या शेवटी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी भारतीय सैनिकांच्या जीवनावरील देशभक्तीवरील गीतांमधून सादर केलेल्या थरारक धाडसी दृश्यांनी अंगावर काटा आणला. आकर्षक वेशभूषा, नेपथ्य आणि थरारक दृश्य यांसह सामूहिक डान्स हे सांस्कृतिक कार्यक्रम लक्षवेधी ठरले.

याप्रसंगी बोलताना ओहोळ म्हणाले की, थोर पुरुषांच्या त्यागा मधून आपण स्वातंत्र्य अनुभवतो आहे. भारतात विविध जाती,धर्म, पंथ असूनही एकात्मता या ताकदीमुळे आज देश देशाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा दबदबा निर्माण झाला आहे. आपल्या परिसरातील स्वर्गीय भाऊसाहेब थोरात,डॉ.अण्णासाहेब शिंदे यांचेसह अनेक स्वातंत्र्यसेनानींनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली.आपला हा उद्योग समूह आणि विविध संस्था या स्वातंत्र्यसैनिकांने स्थापन केलेले आहे.याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. लोकशाही व राज्यघटना हे आपले बलस्थान असून ते टिकवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे. तसेच स्वातंत्र्य सेनानी व राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून प्रेरणा घेत सदैव देश हिताचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सुरक्षा अधिकारी दातखिळे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा विभाग व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी दिलेली शिस्तबद्ध मानवंदना मानवंदना लक्षवेधी ठरली.कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले.

 

चौकट

राजहंस दूध संघ येथेही ध्वजारोहण

संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या वतीने सामूहिक ध्वजारोहण दूध संघाचे चेअरमन रणजीत सिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed