संगमनेर । झुंजार न्यूज

कृष्ण म्हणजे विठ्ठल , विठ्ठल म्हणजेचं कृष्ण तर विठ्ठल म्हणजेचं पांडूरंग देव एक रुप अनेक असून किर्तनातून कुठल्या देवाची भक्ती करायची कुठल्या नाही हे सागितले जात नसून लोकांनी कुठलं पंथाला नाव न ठेवता मनोकामनाने केलेली भक्ती ती भक्ती ईश्वरापर्यत पोहचतेचं ह भ प नामदेव महाराज प-हाड यांनी किर्तनातून सागितले .
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे श्रावणी महीन्यातील अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होवून पहिल्याचं दिवशी झालेल्या किर्तनातून ह भ प नामदेव महाराज प-हाड हे बोलत होते .
यावेळी गावातील कार्यकर्त्यानी अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन करत सोमवार दि २१ रोजी सप्ताहास सुरुवात करण्यात आली वाड्या – वस्त्यासह संपूर्ण गावा वेगवेगळे ग्रुप तयार करत दररोज अन्नदान होत असून पहिल्या दिवसापासून स्वयंस्फुर्तीने लोकांच्या सहभाग दिसून आल्याने संपूर्ण सप्ताहा कालखंडात लोकांची सामाजिकवृत्ती दिसून येणार आहे .  
दिवसभर ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आयोजित केला आहे. दैनंदिन कार्यक्रमात काकडा भजन, श्रींची महापूजा, ज्ञानेश्वरी पारायण, नेमाचे भजन, हरिपाठ तसेच सायंकाळी ७ ते ९ या वेळेत नामदेव महाराज प-हाड (पहिला दिवस ) , आत्माराम महाराज टेकाळे ( दुसरा ) , उत्तम महाराज बडे ( तिसरा ) , नवनाथ महाराज गीते ( चौथा ) , अशोक महाराज बर्डे ( पाचवा ) , अर्जुन महाराज चौधरी ( सहावा ) , बाळा महाराज जाधव ( सातवा ) तर रविवार ९ वाजता गोकुळनंद महाराज पवार यांचे मृदुंगविशारद हा कार्यक्रम होईल तर सोमवारी सकाळी ११ वाजता सप्ताहाच्या समाप्ती काल्याचे किर्तन ह भ प दत्तगिरी महाराज यांचे होणार आहे .
यावेळी प-हाड महाराज म्हणाले की , विठ्ठल नावात  मोठी शक्ती असून सर्वदूर त्या नावाचा जय जयकार होतो . मणुष्य जन्म हा एकदाचं असतो त्यां जन्माचा सार्थक केला पाहिजेल .
यावेळी सप्ताहाच्या पहिल्याचं दिवशीय सुंदर असा महाप्रसादाचे आयोजन केले होते . या प्रसादाचा मोठ्या उत्साहाने भक्तांनी , ग्रामस्थानी लाभ घेतला .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *