संगमनेर । झुंजार न्यूज

जाखुरी येथे झालेल्या परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहासाठी येणाऱ्या भाविकांची सुविधा व्हावी याकरता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून व मदतीतून जाखुरी – शिरापूर शिव रस्ता खुला झाला असून यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले आहे.

 अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या जाखुरी – शिरापूर – निमगाव टेंभी या तीन गावांच्या  शिव रस्त्यासाठी अनेक अडचणी होत्या अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित होते. या कामी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी जाखुरी मध्ये होत असलेल्या भव्य दिव्य परमपूज्य गगनगिरी महाराज सप्ताह निमित्ताने प्रशासन व कारखान्याच्या मदतीने हा शिवरस्ता खुला केला आहे. 

 सप्ताहासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी याकरता जाखुरी शिरापूर व निमगाव टेंभी या शिवारात असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी शिव रस्ता खुले होण्यासाठी ग्रामस्थांनी आपापसातील तंटे गावात बसून मिटवले. यामुळे एकीचा संदेश देण्याबरोबर भाविकांची मोठी सोय झाली .

    याचबरोबर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यानेही शिवरस्ते खुली करण्याकरता सातत्याने जेसीबी पुरविले. हे काम लवकरात लवकर व चांगले होण्यासाठी इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाने ही मोठा पाठपुरावा केला. रणजीतसिंह देशमुख यांनी या सप्ताह कामे मोठे योगदान देत राजहंस दूध संघाच्या वतीने सप्ताहामध्ये दोन टँकर ताक भाविकांना दिले.

 गावाची एकी व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून झालेले काम यामुळे हा एक आदर्शवत रस्ता तयार झाला आहे. 

       

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *