संगमनेर । झुंजार न्यूज

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार मागासवर्गीय युवकांना अर्धनग्न करून आणि झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण केलेल्या आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करून त्वरीत अटक करत त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्याकरिता संगमनेर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पोलिस उपविभागीय आधिकारी यांना निवेदन देण्यात येवून बुधवार दि ३० ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रस्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी निवेदनाद्रारे दिली आहे .
या निवेदनात पुढे म्हटले की , गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हरेगाव येथील चार मागासवर्गीय तरुणांना शेळी आणि चार कबुतरे चोरल्याच्या संशयावरून हरेगाव-उंदीरगाव शिवारात युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे यांनी शेतातील विहिरीकडे नेत. तिथे त्यांना अर्धनग्न करून हात-पाय बांधून उलटे टांगून अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने संपुर्ण राज्यातून दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेबाबत निषेध नोंदवत . अनेक दिवसापासून या – ना – त्या कारणावरुन काही समाजकंटकाकडून दलित समाज्यात प्राण घातक हल्ले होत असल्याने समाज्यात दोषीत वातावरण निर्माण करत असल्याने हे समाज्यासाठी धोक्याचे असून अशा संमाजकंटकांना त्वरीत शासन झाले पाहिजेल या मागणी करिता संगमनेर रिपब्लिकन पक्ष ( आठवले ) व एकलव्य आदिवाशी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले तर या युवकांना न्याय मिळण्याकरिता संगमनेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुधवार दि ३० ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ वाजता रस्ता रोको करण्यात येणार आहे   
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, ज्येष्ठ नेते माणिकराव यादव, शहराध्यक्ष कैलास कासार, युवक अध्यक्ष योगेश मुन्तोडे, तालुका कार्याध्यक्ष विजय खरात, एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष अनिल बर्डे , मधुकर सोनवणे, रमेश भोसले, प्रकाश वाघमारे, शरद जमदाडे, बाळासाहेब कदम, नानाभाऊ कदम, स्वप्निल कदम, विजय  मुन्तोडे, रुपेश राऊत, मेजर भोसले, जनार्दन साळवे, गौरव जगताप, सिद्धार्थ खरात, शहनावाज बेगमपुरे, विकास गायकवाड, संपत भोसले, सागर शिंदे, गौतम वर्पे, राजू वाघमारे, लक्ष्मण मेंढे, शरद तपासे, आत्माराम अंडांगळे, रवी रोकडे, रूपालीताई सोनवणे, मीनाताई बिडगर, नाना जगताप. आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
हरेगांव मधील घडलेली घटना ही माणुसकी काळीमा फासणारी असल्याने या घटनेची माहिती व भेटी करिता  केंद्रीय मंत्री ना डॉ रामदास आठवले शुक्रवारी दि १ सप्टेबर २०२३ रोजी ११ वाजता येणार आहे .
आशिष शेळके ( तालुकाध्यक्ष रिपाई संगमनेर )
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed