कबुतरे;शेळी चोरल्याच्या संशयावरून दलित मुलांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरण
मुंबई । झुंजार न्यूज
या प्रकरणाची माहिती मिळताच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी या माणुसकीला कलंक लावणाऱ्या प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे. येत्या दि. 1 सप्टेंबर रोजी ना.रामदास आठवले हरेगाव ला घटनास्थळी भेट देणार असून पीडित दलित मुलांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.
रिपाइं चे अहमदनगर चे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात; भीमराज बागुल यांनी रिपब्लिकन पक्ष आणि सर्व पक्षीय मोर्चा काढून हरेगाव मधील दलित मुलांना झालेल्या अमानुष मारहाणीचा तीव्र निषेध केल्याची माहिती दिली.हरेगाव दलित अत्याचार प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित मुलांना न्याय मिळावा यासाठी केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले हे हरेगाव ला येत्या दि. 1 सप्टेंबर रोजी भेट देणार आहेत अशी माहिती रिपाइं चे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी दिली आहे
