संगमनेर । झुंजार न्यूज
राजहंस दूध उत्पादक प्रक्रिया संघ यांच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर योजनेचा स्मार्ट कार्ड वाटप आज मौजे संगमनेर खुर्द येथील दक्षिणमुखी हनूमान महाराजांच्या पावन भूमीत शिवनेरी सहकारी दूध उत्पादक संस्था संगमनेर खुर्द येथे करण्यात आले.
संगमनेर तालूका सहकारी दुध संघाचे चेअरमन मा.श्री.रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते शिवनेरी सहकारी दूध संस्था संगमनेर खु. येथील दूध उत्पादक शेतकरी बाधंवाना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.
यावेळी आनंदराव गुजांळ , संगमनेर कारखान्याचे संचालक रमेश गुजांळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कैलासराव पानसरे , दूध संघाचे संचालक मा.श्री. विलासराव वर्पे , मा.श्री.संतोष मांडेकर , डॉ. प्रमोद पावसेसो, मा.श्री. संजय पोकळे, माजी संचालीका शैलजाताई देशमुख , सुभाषपाटील गुजांळ , ॲड. भाऊसाहेब गुजांळ , राजेंद्र देशमुख , कैलासपाटील गुजांळ , गुलाबभाई शेख , बिलालभाई शेख , किरण गुजांळ , रामराव गुजांळ ,सरपंच सौ. श्वेताताई मंडलीक , उपसरपंच गणेश शिंदे , सर्व सदस्य , शिवनेरी पंतसंस्था चेअरमन रमेश सुपेकर ,व्हा चेअरमन भगवान गोफणे, शिवनेरी दूध संस्थेचे चेअरमन किसन सातपूते , व्हा. चेअरमन रमेश गुजांळ सर्व संचालक , सोसायटीचे चेअरमन व्हा.चेअरमन संचालक मंडळ , तसेच संगमनेर खु. येथील सर्व संस्थेचे सर्व चेअरमन , व्हा. चेअरमन तसेच संचालक मंडळ , दुध उत्पादक युवक , महिला,ग्रामस्थ मोठ्या संख्खेंने उपस्थित होते.
