संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या सर्व गुणवंतांचा गुणगौरव सोहळा व युवकांना करिअर मार्गदर्शन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 8.30 वा. मालपाणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राणी प्रसाद मुंदडा यांनी दिली आहे.
तालुक्यातील गुणवंतांच्या गुणगौरव सोहळ्या बाबत अधिक माहिती देताना राणी प्रसाद मुंदडा म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल म्हणून राज्यभर गौरवला जात आहे. याचबरोबर गुणवत्तेचे शैक्षणिक केंद्र असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी केला जात असून यामुळे नवीन विद्यार्थ्यांना व युवकांना प्रेरणा मिळत असते.
संग्राम करिअर अकॅडमी, संग्राम नागरी सहकारी पतसंस्था व जयहिंद लोक चळवळीच्या वतीने यावर्षी 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता मालपाणी लॉन्स येथे हा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन होणार आहे यावेळी युवा व्याख्याते प्रा विठ्ठल कांगणे यांचे मार्गदर्शन होणार आहे. याप्रसंगी विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, विधानपरिषदेतील युवा आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात,सौ.रचनाताई मालपाणी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या गुणवंतांचा गुणगौरव व करिअर मार्गदर्शन मेळाव्यासाठी तालुक्यातील युवकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संग्राम पतसंस्थेचे उपाध्यक्ष विजय गिरी, सर्व संचालक मंडळ, मॅनेजर उमेश शिंदे, प्रकल्प प्रमुख सोमेश्वर दिवटे व जयहिंद लोकचळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.
