संगमनेर । झुंजार न्यूज
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे..’ हा संदेश केवळ उक्तीपुरताच न ठेवता वनकर्मचाऱ्यांनी तो प्रत्यक्ष कृतीत आणल्याचे दिसून आले आहे काही ठिकाणी तर विदयार्थ्यानी पर्यावरणपूरक वस्तूंपासून बनविलेल्या राख्या झाडांना बांधून त्यांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. झाडे आपले रक्षण करतातच; पण त्यांच्याही रक्षणाची जबाबदारी असल्याने चणेगांव येथे वनकर्मचारी म्हणून कार्यरत असणारे हरिचंद्र जोजर यांनी चणेगांव शिवारातील असणाऱ्या वनविभागातील २० हेक्टर क्षेत्रात विविध प्रकारचे १४००० झाडे लावून एक उच्चांक केला मात्र झाडे लावून त्यांचे संगोपन केल्याने रक्षाबंधन या पवित्र नातेच्या सणाच्या निमित्ताने प्रत्येक झाडाला राखी बांधून रक्षण करण्याचे संकल्पनाचं वनकर्मचाऱ्यानी घेतल्याने एक स्तुतिय उपक्रमाला सुरुवात केली .
रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण भावाला राखी बांधून तिच्या रक्षणाची जबाबदारी भावाच्या खांद्यावर टाकते. सध्या निसर्गाची होणारी हानी लक्षात घेता, त्याच्या संवर्धनाची जबाबदारी माणसाने घेतली पाहिजे . झाडांना पर्यावरणपूरक राख्या बांधून ‘तुम्ही झाडांना वाचवा, ती तुम्हाला वाचवतील’ असा संदेश देत जोजर यांनी समतोल पर्यावरण वाचविण्यासाठी आपल्या शेतात , परिसरात , घराजवळ झाडे लावा , झाडे जगवा असे नागरिकांना आवाहन केले .
या – ना त्या कारणावरुन मानवाकडून सध्या होत असलेली वृक्षतोड आणि अन्य विविध कामांमुळे पर्यावरणाची जैविक साखळी धोक्यात आली आहे. भूतलावरील जीवसृष्टीला नैसर्गिक आपत्तीचा धोका होऊ नये, म्हणून पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे. भविष्यात निसर्ग समतोल राहण्याकरिता नैसगिक जागृती होणे गरजेचे असून लोकांनी पर्यावरणाचे महत्त्व समजावून घेणे व, त्याचे संवर्धन करणे हीच भावना रक्षाबंधन सणानिमित्ताने हरिचंद्र जोजर यांनी व्यक्त केली .
चौकट
चणेगांव परिसरात २० हेक्टर क्षेत्रात खैर , लिंब , वड , पिंपळ , उंबर , वावळा आदी जातीचे १४००० झाडे लावून त्यांचे संगोपन केल्याने आजमितिला एक वर्षाच्या कालावधीत ही झाडे ५ ते ६ फुट झाल्याने एक आश्चर्य व्यक्त होत असून वनाधिकारी पाटील , सांगळे यांनी या
