ऊस विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ
संगमनेर । झुंजार न्यूज
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी भाव देण्याबरोबर शेतकरी, सभासद व कामगारांचे हित जपले आहे. सन २०२४-२५ या गळीत हंगामाकरिता ठिबक सिंचन साठी प्रति एकरी 50 टक्के अनुदान तर प्लास्टिक ट्रे मधील प्रति रोपासाठी 1 रुपये अनुदान दिले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.
थोरात कारखान्याकडून राबवल्या जाणाऱ्या ऊस विकास योजनेअंतर्गत विविध योजनांची माहिती देताना ओहोळ म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखाने कायम ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांची हित जपली असून उच्चांकी भाव दिला आहे. को जनरेशन सह विविध इतर उपक्रम राबवताना कारखान्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या कारखान्याचा राज्य व राज्य राष्ट्रीय पातळीवर सातत्याने सन्मान झाला आहे.
ऊस विकास योजनेअंतर्गत सन 2024-25 या गळीत हंगामासाठी जे शेतकरी ऊस लागवड करतील किंवा खोडवा पीक घेतील तसेच ज्यांनी आडसाली ऊस लागवड केलेली असेल अशा शेतकऱ्यांना प्रति एकरी पेप्सी लेटरल ठिबक सिंचन साठी 50% अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे . या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनावरील ऊस क्षेत्रात मिळणारे शंभर रुपये अनुदानाचा लाभ मिळणार नाही.
तसेच 2024- 25 मधील ऊस लागवडीसाठी प्लास्टिक ट्रे मधील ऊस रोपांसाठी प्रतिरोप एक रुपये अनुदानाने पुरवठा करण्यात येणार आहे.
ऊस लागवड योजना व ऊस विकास कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी कारखान्याचे शेतकी विभागाशी संपर्क साधून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी व ऊस उत्पादकांनी लाभ घ्यावा असे आवाहन व्हा.चेअरमन संतोष हा, सर्व संचालक मंडळ, व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व भाऊसाहेब खर्डे यांनी केले आहे
