मुंबई | झुंजार न्यूज
जालना येथील आंदोलकांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीस प्रारंभ झाला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार भरत गोगावले, माजी आमदार अर्जुन खोतकर, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित आहेत.
मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत, दादाजी भुसे तसेच औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी देखील या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले आहेत..
