राहाता । झुंजार न्यूज
राहाता तालुक्यातील एकरूखे येथे जय जिजाऊ महिला सहकारी पतसंस्थेचा शुभारंभ सरला बेटाचे ह.भ.प. महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते व महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यानिमिताने सहकारी पतसंस्थांच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि या संस्थेत महिलांनी पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी पतसंस्था फेडरेशनचे श्री. सुरेश वाबळे, डॉ. धनंजय धनवटे, श्री. बाळासाहेब डांगे, श्री. ज्ञानदेव चौधरी, श्री. पुखराज पिपाडा, डाॅ. स्वाधीन गाडेकर, संस्थेच्या चेअरमन सौ. देवयानी कार्ले, व्हा. चेअरमन सौ. मनिषा पगार, तहसिलदार श्री. अमोल मोरे, कृषी अधिकारी श्री. आबासाहेब भोरे यांच्यासह समस्त सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.
