संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पठारभागातील असणार्या पिंपळगांव देपा शिवारातील मोधळवाडीमधील आदीवाशीच्या असणार्या शेतजमिनीलगत लमान्या पाझर तलावाची भींतीजवळील उत्खन करत निर्माण केलेले शेततळे त्वरीत बंद करुन बुजविण्यात यावे अशी मागणी एकलव्य संघटनेने निवेदनाद्रारे तहसिलदारांना केली आहे .
या निवेदनात पुढे म्हटले की , मोधळवाडी येथे आदीवाशी समाज्याच्या क्षेत्रात परिसराकरिता पाणी उपलब्ध व्हावे याकरिता लमान्या पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली . याच पाझर तलावाजवळ फकिरा मोमीन यांनी जमिन घेत पाझर तलावाच्या शेजारीचं जे सी पी च्या साहय्याने उत्खन करत शेततळे निर्माण केले पाझर तलावाच्या भींतीचा एकाबाजूने आधार घेत शेततळ्याला तीनबाजूने भींत उभी केली भविष्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास भींती तोडल्याने पाण्याची गळती होवून मोठ्या प्रमाणात पाण्याचा दाब वाढल्याने शेततळे फुटू शकते यामुळे आदीवाशीच्या वस्त्यांना मोठा धोका निर्माण होवू शकतो तसेचं पाझर तलावाच्या भींतीवरुन आदीवाशी समाज्याची वहीवाट असून भींतचं कोरल्याने रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला . या पुर्वी याबाबत तक्रार केली असता प्रशासनाने शेततळे त्वरीत बंद करण्याचे आदेश दिले होते . मात्र उत्खनन केले खड्डे व कोरलेली भींत अजून दुरुस्त झालेली नसल्याने मोठा पाऊस झाल्यास धोका निर्माण होईल तरी संबंधीताना दुरुस्त करण्याचे आदेश दयावे असे एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल बर्डे , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब केरू खरात , बाळासाहेब भानुदास पवार , दिलीप भिकाजी खरात , साहेबराव कोंडीराम खरात , भाऊसाहेब माळी , एकलव्य संघटना टायगर फोर्स उपाध्यक्ष बाळासाहेब पवार , गौतम बाळू पवार , संतोष भानुदास पवार , पिण्या अशोक पवार आदींनी केली आहे .
चौकट
पाझर तलावलगत शेततळ्या निर्माण करत असल्याची तक्रार साहेबराव खरात यांनी केल्याने त्यांचा राग धरुन जाकिर फकिरा मोमीन यांनी मला गावात आडवून ‘ तुमच्या पतीचे कमी जास्त झाले तर तुम्ही तुमचे बघा ! अशी धमकी दिल्याने माझ्या कुटुबांला धोका निर्माण झाला आहे तसेच पिन्या खरात , गौतम खरात व अशोक खरात यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली . i
निकिता साहेबराव खरात ( तक्रारदाराची पत्नी , मोधळवाडी )
