संगमनेर । झुंजार न्यूज
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पास तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने शानदार कार्यक्रमात गौरवण्यात आले.
पुणे येथे झालेल्या को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने भारतात सहकारातून वीज निर्मितीसाठी काम करणाऱ्या कारखान्यांचा गौरव देशाचे ज्येष्ठ नेते खा शरदचंद्रजी पवार व फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.यांच्या हस्ते करण्यात आला. कारखान्याच्या वतीने हा पुरस्कार चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हा. चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी स्वीकारला.
काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम उच्चाकी भाव देताना शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक यांचे हित जोपासले आहे. गुणवत्ता पूर्ण वाटचालीमध्ये सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प यांसह विविध उप पदार्थांची निर्मिती केली जात आहे.
नवीन 5500 हजार मे.टन क्षमतेचा कारखाना व 30 मेगावॅट को जनरेशन निर्मितीमुळे कारखान्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे याचा फायदा सभासद व शेतकऱ्यांना होत आहे कारखान्याची कार्यक्षमता व गुणवत्ता ही देशातील इतर सहकारी साखर कारखान्यासाठी मॉडेल ठरली असून कारखान्याच्या चांगल्या कामामुळे सातत्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार या कारखान्याला मिळाले आहेत.
यावेळी बोलताना खा शरद पवार म्हणाले की, सहकारी चळवळीने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे . सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांची आर्थिक शिस्त, काटकसर व पारदर्शकता ही त्रिसूत्री सहकारासाठी मार्गदर्शक ठरली आहे. स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्याच आदर्श तत्त्वावर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार वाटचाल करत असल्यामुळे संगमनेरचा सहकार पॅटर्न हा राज्यासाठी दिशादर्शक ठरला असल्याचेही ते म्हणाले .
यावेळी डॉ जयप्रकाश दांडेगावकर ,बाबा ओहोळ यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी कारखान्याच्या वतीने ॲड शरद गुंजाळ, नवनाथ गडाख, संदीप दिघे, भारत देशमुख, पिंगळे , संजय पाटील आदी उपस्थित होते
कारखान्याला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड .माधवराव कानवडे, बाजीराव पा.खेमनर, सौ दुर्गाताई तांबे ,रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शंकर पा खेमनर, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी, शेतकरी ,सभासद यांनी अभिनंदन केले आहे.
