आश्वी । झुंजार न्यूज
जैन धर्मियांचा सर्वात मोठा सण पर्वाधिराज पर्युषण पर्व सवंत्सरी आश्वी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
एखादी चुकीची घटना आपल्या हातून घडल्यास त्याबद्दल माफी मागण्यासाठीही मोठे मन असावे लागते, असे म्हटले जाते. परंतु वर्षभरात केलेल्या चुकांची, पापांची जाणीव ठेवून त्याची माफी मागण्यासाठीही जैन समाजात संवत्सरी सण साजरा केला जातो जैन समाज आणि तो सण म्हणजे संवत्सरी किंवा पर्युषण पर्व. लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच जैन धर्मीयांचा हा सर्वात मोठा उत्सव साजरा करण्यात आला आश्वी येथील जैन श्रावक संघाच्या धर्म स्थान्कात मालेगाव येथुन आलेल्या जैन स्वाध्यायी रेखा नहार, ज्योती मुथ्था, पुष्पा खिंवंसरा यांच्या उपस्थितीत दररोज पहाटे प्रतिक्रमण ,प्रार्थना, अंतरगडसुत्र वाचन,प्रवचन,दुपारी कल्पसुत्र वाचन , रात्री प्रतिक्रमण व धार्मिक,दिवसभर विश्वशांती नवकार महामंत्र जाप, चर्चा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
आठ दिवस पालेभाज्या ,कंदमुळ रात्री भोजन चे त्याग करण्यात आला होता तसेच एकासना म्हणजे एकवेळसच जेवण करणे ,आयंबील म्हणजे तेल ,तुप ,मिठ,साखर ,दुधाचे त्याग करणे ,उपवास म्हणजे ३६तास अन्नाचा त्याग करने तसेच जप ,तप, ध्यान ,दान करत सवंत्सरी पर्युषण पर्व साजरा केला. या वेळी सुमतीलाल गांधी,अमरचंद गांधी,निलेश चोपडा,विनीत गांधी,अभिजीत गांधी,अमित भंडारी,रतीलाल रातडीया,दिपक बोरा,किशोर पटवा,प्रकाश मुथ्था,योगेश रातडीया,इश्वर भंडारी,धनराज गांधी,विलास भंडारी, दिलिप पटवा,पंकज नाके,रोहित भंडारी,वसंत गांधी,सतिष गांधी,चंपालालजी बोरा,नवलमलजी भंडारी,प्रशांत गांधी,प्रकाश गांधी ,राजेंद्र लुनिया,दिलीप लुंकड, सागर रातडीया,निलेश रातडीया सह जैन बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.
