राहाता । झुंजार न्यूज

एकलव्य संघटनांच्या माध्यमातून आदीवाशी समाज्याच्या आरक्षणात धुसखोरी करु नये यासह आदीवाशी च्या विविध निर्माण होणार्‍या समस्या व मागण्याकरिता तहसिलदारांना तालुकाध्यक्ष विलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले .
या निवेदनात विलास मोरे म्हटले की , शिवाजीराजे ढवळे यांच्या नेतृत्वाखालील एकलव्य संघटना यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये एकलव्य आदीवाशी संघटना कार्यरत असून आदीवाशी समाज्याच्या शेतजमिन , घरकुले , बेरोजगारीसह विविध अडी – अडचणी व समस्या सोडविण्याकरिता एकलव्य संघटना कार्यरत आहे . मात्र संध्याच्या डळमळीत झालेल्या राजकारणातून जाती व्यवस्चेमध्ये कुरघुड्या होताना दिसत असून गोरगरिब आदीवाशी समाज्याच्या असणाऱ्या आरक्षणावरुन काही राजकिय लोकांनी डोळा ठेवून त्यावर आक्रमण करण्याचे धोरण असल्याचे दिसून येत आहे . मात्र शिवाजी ढवळे यांच्या आदेशाने व एकलव्य संघटनेचे महासचिव किरणजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने धनगर समाज हा गेल्या काही दिवसापासून अनुसूचित जाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मागत आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करु पाहत असल्याच्या तसेच भाजपचे पक्षाचे काही नेते त्यांना सपोर्ट करत असल्याच्या निषेर्धात राहता तहसील कार्यालय,राहता तालुका पोलीस स्टेशन, तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले 
यावेळी अ नगर उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष श्री देविदास माळी, राहता तालुका अध्यक्ष विलास मोरे,राहता तालुका उपाध्यक्ष सुनील गांगुर्डे, राहता तालुका टायगर फोर्स अध्यक्ष भारत भवर,श्रीरामपूर तालुका युवा अध्यक्ष संदीप भाऊ गांगुर्डे, श्रीरामपूर तालुका टायगर फोर्स अध्यक्ष श्रावण भाऊ गांगुर्डे, लोणी येथील एकलव्य संघटनेचे भाऊसाहेब माळी, अनिल बर्डे, अविनाश मोरे, किरण गायकवाड, कैलास बर्डे ,राम वाघ, भाऊसाहेब मोरे, तसेच राहता तालुक्यातील एकरुखे ,वाकडी ,नांदूर ,राजुरी,लोणी, गणेश नगर, रांजणखोल येथील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *