कोपरगाव
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व संजिवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी गोरगरीब रुग्णांच्या वैद्यकीय सेवेसाठी फिरता दवाखाना ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणून राबविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम केला असल्याचे प्रतिपादन कासली सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी केले.
तालुक्यातील कासली येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करून त्यांना विनामूल्य औषध उपचार दिले त्याचे उद्घाटन करताना रावसाहेब जाधव यांनी केले त्याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी पूर्व भागातील उपेक्षितांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी जीवाचे रान केले, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाने कारखान्याने या भागात शेततळी, दगडी साठवन बंधारे, पाझर तलाव बांधून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मोलाची मदत केली आहे., दुष्काळात जनावरांना चारा व नागरिकांना पिण्याचे पाणी देखील पुरवलेले आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे काम करत आहेत. संजीवनी उद्योग समूहाने पूर्व भागात सर्व प्रकारच्या अडचणी सोडून शेतकऱ्यांना सतत मदतीचा हात दिलेला आहे. जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे हे देखील सातत्याने सामाजिक सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी युवकांना संघटित करून प्रत्येक गावात वाड्या वस्त्या वर मूलभूत गरजा जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केलेली आहे.
याप्रसंगी सर्वश्री नारायणराव गायकवाड, अंबादास पाटोळे, अशोक शिंदे, शिवाजीराव भगुरे, अशोक भानुदास शिंदे, शिवाजी जाधव, संतोष भागवत, अशोक गायकवाड, सोपानराव गव्हाळे, किसन गव्हाळे यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या फिरता दवाखान्याअंतर्गत शंभर रुग्णांची तपासणी करण्यात आली. डॉ. सोनवणे यांनी आजारपणात काय काळजी घ्यायची, तसेच महिलांनी आरोग्याच्या समस्याकडे दुर्लक्ष करू नये, वेळीच वैद्यकीय उपचार घ्यावे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मोतीराम शिंगाडे यांनी मानले.
