आश्वी | झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर येथे मन हेलवणारी घटना घडली ! वडीलांच्या दशक्रिया विधीतचं ४० वर्षिय मुलाचा हदयविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू झाला .
 पिंप्री लौकी अजमपुर गावात गुरुवारी मनाला सुन्न करणारी घटना घडली . १० दिवसापुर्वी येथील मनमिळावु मितभाषी जुन्या पिढीचे पदवीधर असे लक्ष्मण दराडे यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले होते . त्यांचा गुरुवार दि २१ रोजी त्यांचा दशक्रिया विधी होता . दशक्रिया विधी पार पडत असतांना काकदपर्श होण्या अगोदरच त्यांचा मोठा मुलगा दिलिप वय ४० वर्षे हा वडीलांच्या पिंडाला कावळ्यांनी मोक्ष दयावा म्हणुन नातेवाईक ग्रामस्थांसह हात जोडुन उभा राहिला असता अचानक खाली कोसळल्याने वातावरण सुन्न झाले काही कळेना मात्र परिस्थितीचे गांभिर्य ओळखून या गावातील सामाजिक कार्यकर्ते भारतराव गीते , रमेश गीते , मगन गीते , भाऊसाहेब मुंढे , संजय बिडवे , बाजीराव गीते , डॉ रंगन्नाथ गीते , सूर्यभान गीते नामदेव आव्हाड , आनंदा दराडी , सतिष सोसे आदीसह ग्रामस्थांनी वेळ न घालवता आश्वी येथील डॉ गणेश गायकवाड यांचे दवाखान्यात नेण्यात आले मात्र पेशेंटची आवस्था बघता पुढील उपचारासाठी प्रवरा हॉस्पीटलमध्ये दाखल केले मात्र दिलिप दराडे या उमद्या तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले हदय विकाराच्या तिव्र झटक्याने वडीलांच्या पाठोपाठ मुलानेही जगाचा निरोप घेतला ही बातमी वार्‍यासारखी परिसरात पसरली .
 स्व दिलीप दराडी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले . यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता .
 मन हेलावणाऱ्या या घटना घडल्याने संपुर्ण गांवात दुःखाचे वातावरण निर्माण झाले ७ वर्षापुर्वी या कुंटुंबातला मयत दिलिपचा लहान भाऊ इंजि महेंद्र यांचा सांगोला (पंढरपुर )या येथे अपघाती निधन झाले होते ते दुःख हे कुटुंब पचवत असतांना नियतिने १० दिवसात घरातील २ पुरुष हिरावुन नेल्याने आता या कुटुबांची संपुर्ण जबाबदारी दोन महिलावर आल्याचे चित्र दिसत आहे .
 त्याच्या पश्चात आई , पत्नी , दोन चिमकुले मुले असा परिवार आहे स्व . लक्ष्मण दराडे व स्व दिलिप दराडे यांच्या निधनाची वार्ता समजताच राज्याचे महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील , जि प मा अध्यक्षा  सौ शालिनीताई विखे पाटील  यांनी दुःख व्यक्त केले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *