संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील कौठे – मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लि. या कंपनीला दिलेला धनादेश वटला नाही म्हणुन न्यायालयाने आरोपीस कारावासाची शिक्षा दिली .
श्री गजानन महाराज शुगर लि . भक्तनगर ,कौठेमलकापुर ,ता.संगमनेर (पुर्वीचे नाव युटेक शुगर लि.) यांनी श्री.शांताराम दामु गवांदे ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार यांचेविरुद्ध मे.चीफ ज्युडी.मॅजीस्ट्रेट,संगमनेर यांचे कोर्टात भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा १३८ अन्वये तक्रार दाखल केलेली होती.
ऊस तोडणी वाहतुकीपोटी अँडव्हान्स रक्कम घेवुनही श्री.गवांदे कामावर आलेले नाहीत. कारखान्याने त्यांना दिलेली अंडव्हान्स रक्कम भरणा करणेस सांगुनही व वेळोवेळी कळवुनही सदरची रक्कम त्यांनी भरणा केलेली नाही. कारखान्याचे शेतकी खात्याचे वरिष्ट अधिकारी यांनी वेळोवेळी त्यांची समक्ष भेट घेवुन रक्कम भरणा करण्यास सांगितले असता त्यांनी कारखान्यास रक्कम भरणापोटी चेक दिलेला होता. व रक्कम भरणा करण्याचे मान्य केले होते. फिर्यादी कंपनीने सदरचा चेक बँकेत भरणा केला परतुं तो न वटता परत आला तद्नंतर कंपनीने आरोपी श्री शांताराम गवांदे यांचे विरोधात संगमनेरच्या चीफ ज्युड़ी. मॅजीस्ट्रेट यांचे कोर्टात एस.एस.सी.नं.८६३/२०१८ अन्वये भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा १३८ अन्वये तक्रार दाखल करण्यात आलेली होती.
सदर फिर्यादीमध्ये कारखान्याची अशी तक्रार होती की, आरोपी शांताराम दामु गवांदे याने गळीत हंगाम सन २०१७-१८ मध्ये युटेक शुगर लि. या कंपनीकरीता ऊस तोडणी व वाहतुक करुन कारखाना कार्यस्थळावर पोहचवण्याचा ठेका घेतला होता. व तसा लेखी करारनामा कारखान्याच्या लाभात लिहुन दिलेला होता. व कारखान्याकडून ऊस तोडणी मजुरांना देण्यासाठी रक्कम रु.३.०० लाख अँडव्हान्स म्हणुन घेतलेली होती. या खटल्याचा निकाल होवुन आरोपी श्री.शांताराम दामु गवांदे याला न्यायालयाने भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा १३८ अन्वये फौजदारी प्रक्रीया संहीतेचे कलम २५५ (२) अन्वये दोषी ठरवत एक वर्षाची कारावासाची शिक्षा व रक्कम रु.३,१०,०००/- चा दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास आणखी चार महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाच्या रक््कमेतुन कंपनीच्या धनादेशाची रक्कम कंपनीला परत करावयाची आहे. न्या.गिरी साहेब यांचे समोर खटल्याचे कामकाज सुरु होते. साखर कारखान्याचे वतीने सदर खटल्याचे कामकाज अँड.श्रीकांत एच.गोंगे यांनी चालवले. न्यायालयासमोर आरोपी श्री.गवांदे यांनी वादातील धनादेश दिल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे.
