शिर्डी । झुंजार न्यूज
आपल्या बातम्या विरोधात येवू नये म्हणून त्यांना चहा प्यायला बोलवा , जेवनाकरिता हॉटेलवर न्या म्हणणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरावर निषेध होत असून त्यांनी पत्रकारांची माफी मागावी ही मागणी पत्रकारांमधून होत आहे
विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे.
ज्याअर्थी बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी असे राजेंश गायकवाड , सिद्धार्थ मेहेरखांब , सोमनाथ सोनपसारे , सुभाष भालेराव , रविंद्र बालोटे , किशोर वाघमारे आदीनी केली आहे .
