राहाता । झुंजार न्यूज
राहाता तालुक्यातील एकरूखे गावातील सोमनाथ बंडू मोरे या तरुण आदिवासी च्या मूलाला मारहाण झाल्याबद्दल एकलव्य संघटनेच्या मागणी वरून राहाता पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदर मिळालेली माहिती अशी कि , राहाता तालुक्यातील एकरूखे या गावातील अमोल अविनाश कुंदे , धनजंय अविनाश कुंदे व त्यांच्या दोन धनदांडग्या सहकाऱ्यांनी सोमनाथ बंडू मोरे या आदिवासी तरूणाला एकटे पाहून हॉटेल गीत गंगा समोर कोयताचे धाक दाखवून त्याला जबर मारहाण केल्याने मारेकर्यांच्या विरोधात त्वरीत गुन्हा दाखल करुन त्यांना त्वरीत अटक करावी अशी मागणी एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष विलासराव मोरे उपाध्यक्ष सुनिल गांगुर्डे , श्रावण गांगुर्डे , संदीप गांगुर्डे , अनिल आहेर ,अक्षय बर्डे भारत भवर , विक्रम सोनवणे , योगेश सोनवणे आदीनी केली होती त्यानुसार राहाता पोलिस स्टेशनमध्ये अमोल कुंदे , धनजंय कुंदे व दोन सहकार्यांवर भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३०७ , ३३७ , ३४१ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला
तरी आरोपीस अटक करावी अशी मागणी एकलव्य संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे .
