कोपरगांव । झुंजार न्यूज
कोपरगाव येथे आदीवाशी बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रेवणनाथ जाधव यांच्या आदेशाने आदीवाशी ( ST ) समाज यांच्या आरक्षण संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानाने नाराज झालेल्या आदीवाशी बहजन पक्षाच्यावतीने निषेध व्यक्त करत कोपरगांव तहसिलदारांना निवेदन देण्यात आले .
यावेळी आदीवाशी बहुजन संघटना प्रदेशाध्यक्ष दत्तात्रेय आगे यांच्या नेतृत्वाखाली, मा विठ्ठल सोनवणे , मा अनिल पवार , मा भीमराज साळुंखे , मा बाळासाहेब साळुंखे , मा भीमराज माळी , सौ जयश्री भालेराव , मा बाळासाहेब जाधव , मा संजय जिरे , मा रवींद्र पवार, मा साईनाथ सोनवणे ,मा अण्णासाहेब मोरे ,मा श्याम मोरे ,मा भीमा मोरे ,मा प्रकाश पवार, मा भाऊसाहेब मोरे , मा सतोष मोरे, मा संजय चव्हाण , मा बाळासाहेब माळी , मा लक्ष्मण गायकवाड , मा भगवान प्रसाद , मा संभाजी बर्डे , मा भानुदास भालेराव , मा माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
आदिवासी समाजाचे आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री यांनी जे वक्तव्ये केले आहेत त्या वक्तव्याला आदिवासी समाजाचे ST आरक्षण संदर्भात जी चर्चा केली त्यावरुन एकलव्य संघटना महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाज निषेध करत आहे तसेच या वक्तव्ये वरुन संपूर्ण महाराष्ट्रभरातून आदीवाशी समाज नाराज झाले आहेत संविधानानुसार ST समाज ज्याचे आरक्षण कोणी घेऊ शकत नाही यांचा अधिकार सुध्दा मुख्यमंत्री यांना नाही मुख्यमंत्री यांनी वक्तव्ये करण्या आधी सर्व गोष्टीची शहानिशा करणं गरजेचे आहे आदीवाशी समाज्यावर अन्याय झाल्यास आदीव शी बहुजन संघटना तसेच महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाजाला बरोबर घेवून आंदोलन छेडण्यात येईल महाराष्ट्र राज्य आदिवासी समाज आरक्षण कोणाला देता येत नाही तसेच भारतीय संविधान नुसार एसटी समाजाचे आरक्षण कोणालाही हात घालण्याचा अधिकार नाही धनगर समाज्याला आरक्षण मिळून देवू हे मुख्यमंत्र्यांचे भुलभुलैयाचा प्रकार करत आहे . धनगर समाजाला आदिवासीचे आरक्षण का देतात सखोल चौकशी करा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचा निषेध करून तीव्र आंदोलन सुरु करा असे आवाहन करण्यात आले आहे असे निवेदनात म्हटले आहे .
