“माझा सत्यजित”
माझा छोटा मुलगा डॉ.हर्षल लाडाने त्याला लहानपणी “ददु” म्हणायचा. मग मी पण लाडाने “ददुच” म्हणते. सत्यजित खूप मायाळू आहे. लहानपणा पासूनच मैत्री जपणारा, दुसऱ्याची प्रत्येक क्षणी काळजी घेणारा असा त्याचा स्वभाव आहे. स्पष्ट, परखड हे गुण मुळातच त्याच्या स्वभावत आहे. संघटन कौशल्य तर खूपच आहे, नेतृत्वा मध्ये जे गुण पाहिजे ते नेतृत्व गुण त्याच्यात आहे.
काँग्रेस पक्षाविषयी खुप निष्ठा आहे. त्याला लहानपणापासूनच वाचनाची खुप आवड आहे. त्याचे व्यक्तीमत्व घडतांनी त्याचे आजोबा स्व. भास्करराव तांबे, सहकार महर्षी ति. भाऊसाहेब थोरात, मामा कॉग्रेसचे जेष्ठ नेते मा.श्री.बाळासाहेब थोरात, वडील आमदार डॉ.सुधीर तांबे, दोन्ही आजी ति. प्रयागाबाई, ति. मथुराबाई दोन्ही कुटुंबाच्या संस्कारातुन सत्यजित घडला. त्याची जडण घडण उत्तम प्रकारची एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणूनच झाली. कोणतेही काम तो लगेच हाता वेगळे करतो, निर्णय क्षमता जबरदस्त आहे, दिवसभर तो प्रत्येकाचे प्रश्न सोडवीत मार्गदर्शन करत असतो. कामांचे उत्तम नियोजन केलेले असते. त्याचे वक्तृत्व खूप चांगले आहे.
अशा माझ्या कर्तृत्ववान “ददु” ला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा त्याचे पुढील आयुष्य आरोग्यदायी, आनंददायी जावो त्याला आयुष्यात खुप यश मिळो हीच परमेश्वर चरणी मनःपूर्वक प्रार्थना करते.
सौ दुर्गा सुधीर तांबे,
मा. नगराध्यक्ष, संगमनेर नगरपरिषद,
अध्यक्ष. जयहिंद महिला मंच.
