निर्माल्य व गणेश मूर्ती विसर्जन जाणता राजा येथील मैदानावर करण्याचे आवाहन

संगमनेर । झुंजार न्यूज

 

कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या एकविरा फाउंडेशन च्या वतीने मागील वर्षीप्रमाणे या ही वर्षी गणेश विसर्जन व निर्माल्य संकलन केले जात असून जाणताराजा मैदान येथे कृत्रिम तलावाची उभारणी करण्यात आली आहे यामध्ये नागरिकांनी गणेश विसर्जन करावे असे आवाहन एकविरा फाउंडेशन ने केले आहे.

    एकविरा फाउंडेशनच्या वतीने मागील 4 वर्षापासून गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश मूर्तींचे संकलन करून त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावात केले जाते. तसेच विविध ठिकाणी निर्माल्य संकलन करून त्याची विल्हेवाट लावली जाते. स्वच्छता व पर्यावरणासाठी काम करणाऱ्या एकविरा फाउंडेशनने सातत्याने आदर्शवत भूमिका घेतली असून यामध्ये डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील युवतीने केलेले काम हे इतरांसाठी दिशादर्शक ठरले आहे.

     याबाबत माहिती अशी की डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पूरक गणेश उत्सव संपन्न व्हावा यासाठी एकविरा फाउंडेशन च्या वतीने संगमनेर शहरांमध्ये जाणता राजा मैदानावर भव्य कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील नागरिकांनी गणेश मूर्ती विसर्जन व मंगल यांचे संकलन करावे जेणेकरून प्रवारामाई प्रदूषण मुक्त राहील व पर्यावरण पूरक गणेश उत्सव संपन्न होईल. तरी जास्तीत जास्त शहरातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी गणेश विसर्जन मांगल्याची संकलन करावे असे आवाहन डॉ जयश्री थोरात व एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे यांनी केले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed