संगमनेर । झुंजार न्यूज

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामिण भागातील विदयार्थी हा शिकला पाहिजेल मोठा झाला पाहिजेल हे ध्येय ठेवूनचं शालेय संस्था उभारल्या मात्र आजकालच्या विदयार्थ्याना त्यांची जाणिव दिसत नाही सातात्याने मोबाईल मध्ये गर्क असणार्‍या विदयार्थ्याचे भविष्य कठिण आहे जर विदयार्थ्याना आपले ध्येय साध्य करायचे असेल तर मोबाईल वापरापासून दूर रहा असा मार्मिक सल्ला संगमनेर विभागीय डी वाय एस पी सोमनाथ वाघचौरे सोमनाथ यांनी विद्यार्थ्यांना दिला .

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु ॥ येथील रयत शिक्षण संस्थेचे आश्वी इंग्लिश स्कूल येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिताराम चांडे होते . यावेळी मान्यवरांनी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेचं मान्यवरांच्या शुभहस्ते रांगोळी दालनाचे उदघाटन करण्यात आले .

यावेळी विदयालयाचे माजी पर्यवेक्षक पवार म्हणाले की , कर्मवीर आण्णा अनवाणी पायांनी सह्याद्रीच्या कडे कपारीतून फिरत गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी शिक्षण मिळावे म्हणून खूप मोठा त्याग डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केला तसेच विद्यार्थ्यांनी ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी संकटाचा सामना केला पाहिजे व आई-वडिलांच्या कष्टाची जाण प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवली पाहिजे .

यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी शिंदे अनुष्का व थोरात प्रांजल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत तसेच पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे प्राचार्य श्री बर्डे जे. आर.यांनी केले . विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती संसारे एस. एफ.यांनी शाखा इतिहास याचे वाचन केले

या समारंभानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आणि इयत्ता बारावी व दहावी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे दिले जाणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे शिक्षण प्रेमी बाळकृष्ण होडगर मामा,सुभाषराव म्हसे अण्णा ,सुमती लालभाऊ गांधी विनायकराव बालोटे अण्णा,किशोर एकनाथराव जऱ्हाड पाटील, तानाजी मनाजी गायकवाड, ब्रिज मोहन बिहानी, प्रशांत कोळपकर , केदार शेठ बिहानी, अशोकराव गोसावी, मांढरे साहेब माजी प्राचार्य,भीमाशंकर सारबंदे सौ शकुंतला चिंतामणी मॅडम, चिंतामणी , संजय गायकवाड , अनिल शेळके , रवी बालोटे, अशोक गोसावी,अमोल राखपसरे,अण्णा रामकृष्ण ताजणे ,उंबरकर माजी प्राचार्य सुनील गायकवाड रामनाथ जऱ्हाड, भाऊसाहेब डोईफोडे, आश्वी पो स्टे पो नि संतोष भंडारे , विनोद गंभीरे व सर्व पोलीस स्टाफ आश्वी पोलीस स्टेशन,प्राचार्य बर्डे जे आर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका गाडे यांनी केले तर शिक्षिका सहाने बी. एम. यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमास विद्यालयातील पर्यवेक्षिका लोखंडे मॅडम, शहाणे आर एन, थेटे आर बी, बनकर,घिगे,धराडे , कोकाटे, तांबे,बर्डे, कहार , देवरे, बापू दिघे सिनारे,कडू,उंबरकर, शिंदे ,पिंपळे या शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले तसेच विद्यालयातील शिक्षिका केदार, वाकचौरे, आव्हाड, काळे , रुपवते ,वायळ, किरवे, पोखरकर,पाटील, जंगले,मुंतोडे ,वैद्य, गाडेकर मॅडम यांचेही सहकार्य लाभले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *