संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपन इग्लीश स्कुलच्या चिमुकल्यांनी प्लास्टिक कॅरीबॅग न वापरण्याचे पर्यावरण पुरक गणेशोत्सवाच्या नाटिकेतून व देखाव्यातून पेपर बॅग वापरण्याचे आवाहन केले .
बालपण स्कूल पानोडीचे विद्यार्थी गणेशोत्सव पर्वात प्रत्येक दिवशी पर्यावरण संदेशाचा देखावा व नाटिकेतून समाजप्रबोधनाचे काम करत आहे. आजच्या पर्वात इयत्ता ३रीच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कॅरीबॅग वापरल्याने मानवाच्या पोटात, गायीच्या पोटात कसे प्लास्टिक जाते व त्याचे दुष्परिणाम कसे होतात. यासाठी पेपर बॅगचा वापर करण्याचे आवाहन नाटिकेतून केले. अतिशय सुंदर सादरीकरण चिमुकल्यांनी केले. यासाठी बालपण स्कूल पानोडी च्या प्रमुख सौ सोनाली मुंढे यांच्या संकल्पनेतून प्राथमिक विभागातील प्रतिभा पवार, कावेरी गांजवे व बालपण स्कूल चा सर्व शिक्षक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *