संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय वरवंडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली असून हातपंपामध्ये देखील मोटार बसविण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले यावेळी विद्यार्थी,शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये समाधान व्यक्त झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की गेली दोन वर्षांपासून येथील पाइपलाइन लाईन फुटल्याने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली होती परंतु याबाबत काल रिपाईचे मराठा आघाडी अध्यक्ष गौतम वर्पे,शाखा अध्यक्ष भरत भोसले सुभाष गागरे,उल्हास गागरे रेवणनाथ वर्पे नानासाहेब भोसले शिक्षक.विकास वर्पे.अर्जुन दातीर मुख्याध्यापक लक्ष्मण दिघे यांनी ही समस्या ग्रामपंचायत सरपंच सौ.किरण गागरे व ग्रामसेवक कैलास कराळे ग्रा.प.कर्मचारी भारत भोसले यांच्या लक्षात आणून दिली यावर सरपंचांनी तात्काळ विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करून ही समस्या सोडविली आणि हातपंपामध्ये देखील मोटार बसविण्याचे आश्वासन यावेळी दिले.
