संगमनेर । झुंजार न्यूज
आजच्या समाज्यात विविध उत्सव साजरे होतात मात्र उत्सव हा समाजापयोगी असावा हेचं ध्येय म्हसे वस्ती मध्ये गेल्या अनेक वर्षापासून गणपती उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक विविध उपक्रम राबविले जात असल्याने दिग्वीजय गणेश उत्सव मंडळ व निळकंठेश्वर प्रतिष्ठान उत्सव मंडळ यांचा आदर्श समाजातील इतर मंडळांनी घ्यावा असे आवाहन राष्ट्रपती पदक पुरस्कारर्ते तथा हिगोंलीचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पो नि अनिल कटके यांनी केले .
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु ॥ येथील म्हसे वस्तीवर अनेक वर्षापासून दिग्वीजय गणेश उत्सव मंडळ व निळकंठेश्वर प्रतिष्ठान उत्सव मंडळातील तरुणांनी गणेश उत्सवाची स्थापना केली या गणेश उत्सवाला भेटी प्रसंगी पो नि अनिल कटके बोलत होते .
यावेळी उत्सव हा समाज उपयोगी व्हावा या हेतुनेचं तरुणांनी एकत्र येत गेल्या अनेक वर्षांपासून विविध उत्सव साजरे करत आहे . दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याने गणेश उत्सव स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला . सामाजिक उपक्रम राबवित असताना समाजाचे हित पाहिले जाते तसेच समाज्याला आर्थिक झळ बसू नये म्हणून मंडळातील अशोकराव म्हसे , मारुती म्हसे , बाळकृष्ण मांढरे , शंकर हिंगे गुरुजी , गोविंद म्हसे , किशोर ज-हाड , शिवाजी उंबरकर , रामकिसन उंबरकर , सतिष म्हसे , विजय म्हसे , अनिल म्हसे , प्रविण आढाव , किरण गायकवाड , दिपक भूसाळ , वृषभ निघुते , अनिल कंगणकर , राहुल म्हसे , निलेश चोपडा , कारभारी , म्हसे , राहुल ज-हाड , विनायक ज-हाड , संदिप चतुरे , विजय म्हसे , सुभाष कुलथे , बाबासाहेब म्हसे , चंद्रभान म्हसे , संदीप गीते , संतोष म्हसे , रामनाथ सुपेकर, आदी सदस्यांकडून प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे
दिग्वीजय गणेश उत्सव मंडळ व निळकंठेश्वर प्रतिष्ठान उत्सव मंडळाची स्थापना सर्व जाती धर्मातील तरुणांनी एकत्र येऊन केलेली आहे. सामाजिक उपक्रम अथवा गणेश उत्सवामध्ये समाज उपयोगी कार्यक्रम राबवीत असताना समाजामध्ये वर्गणी अथवा देणगी मागितली जात नाही. मंडळातील सदस्य स्वतः खर्च करीत आहे . यावर्षी अनेक उपक्रम राबविण्यात आले समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज इदोरीकरांचे किर्तन ठेवून सामाजिक , धार्मिक चा मेळ घातला .संगमनेर विभागीय पोलिस आधिकारी सोमनाथ वाघचौरे , आश्वी पोलिस स्टेशनचे संतोष भंडारे आदीसह मान्यवरांनी गणेश उत्सवास भेट दिल्या .
