संगमनेर । झुंजार न्यूज

नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यासह राज्यातून राजकिय नेत्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर जेष्ठासह तरुणांईकडून शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसून आला . 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यांच्या प्रांगणात माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी केक भरवून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी.आ.डाॅ.सुधीर तांबे, लहानुभाऊ गुंजाळ, मा.नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, इंद्रजितभाऊ थोरात यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

तर आमदार तांबे यांना दिवसभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध राजकिय पक्षातील नेत्यांनी दूरध्वनी करुन शुभेंच्छा दिल्या . संगमनेर येथील निवासस्थानी सकाळपासून जेष्ठासह तरुणांईची मोठी रिघ लागल्याचे दिसून आले . 
आ सत्यजीत तांबे हे सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व असून आक्रमक व हसमुख स्वभावाचे असल्याने ते तरुणांचे ताईक बनले . आ तांबे म्हणजे राजकारणातील राजबिंडा व्यक्तीमत्व निर्माण झालेले असून राजकिय भविष्याचे अचुक वेद घेणारे खऱ्या अर्थाने ते आजचे विलासराव देशमुख म्हणणे वावगे ठरणार नाही . भविष्यात नक्कीचं आ सत्यजीत तांबे यांना महत्व असणार हे तरुणांईच्या गलक्यातून समजू लागले आहे . 
आ तांबे पाच जिल्ह्याचे आमदार असल्याने संपूर्ण वेळ हा मतदार संघात जातो मात्र सामाजिक , धार्मिक , सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रमाची आ तांबे संधी सोडत नाही आपल्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्याना वेळ देत फुलगुच्छ आणण्यापेक्षा वह्या पेन घेवून या हा मेसेज पाठवला त्यांचा अनुकरण कार्यकर्त्यानी करत वह्या , पेन आणत वाढदिवसाच्या भरभरुन शुभेंच्छा दिल्या तरुणांईची मोठी गर्दी बघून डॉ सुधीर तांबे व सौ दुर्गाताई तांबे भावूक झाल्याचे दिसून आले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed