संगमनेर । झुंजार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील पिप्री लौकी अजमपुर येथील जुन्या पिढीचे जनसेवा मंडळाचे ज्येष्ठ्र कार्यकर्त बाबासाहेब गंगाराम दातीर यांचे दुःखद निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय ९५ वर्ष होते .
 संगमनेर तालुक्यातील पुर्व भागाकडील असणार्‍या दुष्काळी भागातील पिंप्री लौकी अजमपूर गावातील एक कणखर नेतृत्व बाबासाहेब दातीर यांच्या रुपानं गावांला मिळाले सामाजिक , धार्मिक , राजकिय क्षेत्रात नि: स्वार्थीपणे काम करत गांवाला एक दिक्षा देण्याचे मोलाची भूमिका बजावली .  गावाच्या सर्वागिण विकासाचे शिलेदार व  मनमिळावू स्वभावाचे तसेच गावाच्या धार्मिक शैक्षाणिक व विकास कामात मोठे योगदान असणारे व्यक्तीमत्व बाबासाहेब गंगाराम दातीर यांचे होते . त्याच्या जाण्याने एक मार्गदर्शकांची पोकळी निर्माण झाली . त्यांचे विखे – थोराताशी चांगले संबंध होते . गावांच्या विकास कामात कधीही राजकारण आणण्याची त्यांची भूमिका असत . 
त्याच्या पश्चात पाच मुले , दोन मुली , सात भाऊ , सात बहीण , पुतणे , जावई , सुना , नातवंडे असा मोठा परिवार असून पिंप्री लौकी अजमपुर वि. का सोसायटीचे चेअरमन सिताराम पा दातीर यांचे वडील तर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विकासराव दातीर व गव्हरमेंट कॉन्ट्रक्टर मयुर दातीर यांचे ते आजोबा होते .
त्यांच्या निधनाची वार्ता समजत्याचं सर्व क्षेत्रातील लोकांनी त्याच्या कुटुबास भेट दिली माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी त्याच्या कुटुबांस भेट देत शांत्वन केले
आज त्याचा दशक्रिया विधी होत आहे त्या निमित्ताने ह भ प कांबळे महाराज यांचे प्रवचन होणार आहे  
 ।
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed