संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सातत्याने वावरणारे तथा मनमिळावू व शांत स्वभावाचे असणारे कै . चंद्रभान पुंजा कदम यांचे नुकतेचं हदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय ६३ वर्ष होते .

कै . चंद्रभान कदम यांचा जन्म पानोडी येथील शेतकरी व गरिब कुटुबांत झाला त्यांना चार भाऊ व चार बहीणी असल्याने दुष्काळी परिस्थिती त्यांच्या परिवारांने अत्यंत हलाखीत जीवन काढले . मात्र गरिबी परिस्थितीला न डगमगता परिस्थितीशी सामना करत आठ बहीण – भावाने संघर्ष करत आपली जीवन नौका पार केली .
कै चंद्रभान कदम यांचा राहुरी तालुक्यातील वडनेर येथील मुलीशी विवाह झाला पानोडी येथील आपल्या शेत जमीन कसत आपला छोटाशा संसार उभा केला या संसाररुपी झाडाला सात मुली व एक मुलगा ही फुले उमलली . जीवनातील येणार्या चढ उतारात मुला – मुलीना सुखी करण्याचे ध्येय ठेवत त्यांना सुख – दुःखाचा मार्ग दाखवला संसार संभाळता – संभाळता त्यांना सामाजिक व धार्मिक कार्याची आवड असल्याने मिळालेल्या वेळातुन आपल्या स्वत : ला सामाजिक व धार्मिक कार्यात झुकून देत असत . शांत व मवाळ स्वभावाचे असणारे चंद्रभान कदम नेहमी सर्व कार्यात अग्रेसर असत . त्याच्याचं पाऊलावर पाऊल ठेवत लक्ष्मण हा मुलगा सामाजिक वृत्तीचा असल्याने सर्व क्षेत्रातील कार्यात अग्रेसर दिसत आहे .

कै चंद्रभान कदम यांचे बुधवार दि २७ सप्टेबर २०२३ रोजी हदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले . त्याच्या दशक्रिया विधी शुक्रवारी ०६ आक्टोबर २०२३ रोजी पानोडी येथील कदम वस्तीवर होणार आहे
॥ त्यांच्या आत्म्यास परमेश्वर चिरशांती देवो ॥
